चौदाव्या विधानसभा कार्यकाळात तब्बल 1 हजार 29 तास 18 मिनिटे कामकाज
चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात तब्बल 1 हजार 29 तास 18 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 34 मिनिटे झाले. तर एकूण बैठकांची संख्या 136 आहे. या विधानसभेच्या कार्यकाळात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 96.65 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 82.67 टक्के इतकी होती. विधानसभेत पुनःर्स्थापित 197 शासकीय विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी 183 विधेयके संमत झाली. तसेच सभागृहात नियम 293 अन्वये एकूण 28 सूचनांवर चर्चा झाली. 14 वी विधानसभा दि. 25 ऑक्टोबर 2019 रोजी गठित झाली. तर सभागृहाची पहिली बैठक दि. 27 नोव्हेंबर 2019 रोजी घेण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List