अखेर ‘बिग बॉस मराठी’ची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी सुरू होणार कल्ला

अखेर ‘बिग बॉस मराठी’ची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी सुरू होणार कल्ला

तंटा नाय तर घंटा नाय… रितेश देशमुखचा हा डायलॉग आज महाराष्ट्रातील घराघरात तोंडपाठ झालाय. सर्व रिअ‍ॅलिटी शोचा बाप असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’चे आतापर्यंत चार प्रोमो आऊट झाले. या चारही प्रोमोमध्ये रितेश देशमुखची ‘लयभारी बॉसगिरी’ पाहायला मिळाली. आता एक नवीन प्रोमो ‘बिग बॉस’प्रेमींच्या भेटीला आलाय. प्रोमो पाहून नेटकरी म्हणतायत,”आररर खतरनाक!” या नव्या प्रोमोसोबतच ‘बिग बॉस’च्या घराचं दार कधी उघडणार याचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या आतापर्यंत आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखचा रुबाब पाहायला मिळाला. पण नव्या प्रोमोमध्ये रितेश एका वेगळ्याच रांगड्या अंदाजात दिसतोय. प्रोमोमध्ये एक आगळीवेगळी ऊर्जा अन् जोश आहे. प्रोमोनुसार, यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूव्हमध्ये शिरणार आहेत. जे चांगले वागणार त्यांची रितेश भाऊ वाहवाह करणार… पण जे वाईट वागणार त्यांची तो… एकंदरीत काय तर सगळ्यांची वाजणार अन् हा सिझन गाजणार. कारण रितेश भाऊ म्हणतोय,”मी येणार तर कल्ला होणारच”. आपल्या लाडक्या ‘बिग बॉस’ प्रेमींना नाराज न करता रितेश देशमुखने नव्या प्रोमोच्या माध्यमातून यंदाच्या सिझनची तारीखदेखील जाहीर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi

तारीख जाहीर झाल्याने यंदा कोणते स्पर्धक ‘बिग बॉस मराठी’च्या घरात झळकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ‘बिग बॉस मराठी’चं बिगुल आता वाजणार आणि स्पर्धकांच्या करामतींचा आता कस लागणार आहे. प्रत्येक आठवड्यात झटका लागेल आणि मनोरंजनाचा धमाका होणार आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या सूत्रसंचालकाची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची, अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन येत्या 28 जुलैपासून सुरू होणार आहे. हा शो दररोज रात्री 9 वाजता ‘कलर्स मराठी’वर आणि Jiocinema प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बिग बॉस मराठी 5’चा नवीन प्रोमो पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. महेश मांजरेकर नाहीत, हे जाणून काहींनी नाराजीसुद्धा व्यक्त केली होती. ‘बिग बॉस’ हा शो मराठीत सुरू झाल्यापासून निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीच या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी शोमधून बाहेर पडण्यामागचं कारण सांगितलं होतं. ते म्हणाले, “मी सध्या मणिरत्नम यांच्या चित्रपटात व्यस्त आहे. याशिवाय एका कन्नड चित्रपटाचंही काम सुरू आहे. शूटिंगसाठी मला सतत दिल्ली, लंडन, बँकॉक याठिकाणी जावं लागतंय. पुढील दोन ते तीन महिने मी या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असणार आहे. माझ्या मनातही काही कल्पना आहेत. त्यामुळे हे शूटिंग संपल्यानंतर त्यावर मी काम करणार आहे. म्हणूनच मी सध्या बिग बॉससाठी वेळ देऊ शकलो नाही.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;