लेकाच्या लग्नात नीता अंबानी यांच्या मेंहदीची जोरदार चर्चा, एका व्यक्तीचे नाव नाहीतर तब्बल…
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न सुरू आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. अनेक ठिकाणी प्री वेडिंग फंक्शन देखील झाले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. संपूर्ण बॉलिवूड कलाकार या लग्नाला पोहोचले आहेत. फक्त बॉलिवूडच नाहीतर विदेशातूनही खास लोक या लग्नासाठी दाखल झाली आहेत. या लग्नाची मोठी क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीतचे आणि हळदीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
सध्या सोशल मीडियावर नीता अंबानी यांचेही खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये नीता अंबानी यांचा लूक जबरदस्त दिसत आहे. मात्र, नीता अंबानी यांच्या लूकपेक्षाही अधिक चर्चा ही, त्यांच्या मेंहदीची रंगताना दिसत आहे. लेकाच्या लग्नात नीता अंबानी यांनी अत्यंत खास अशी मेंहदी काढली आहे.
नीता अंबानी यांनी त्यांच्या मेंहदीमध्ये कुटुंबियांची नावे लिहिली आहेत. मेंहदीमध्ये आकाश अंबानी, श्लोका अंबानी, अनंत अंबानी, राधिका मर्चंट, ईशा अंबानी यांची नावे स्पष्टपणे दिसत आहेत. फक्त हेच नावे नाहीतर त्यांनी नातवांची नावे लिहिल्याचे देखील मेंहदीमध्ये दिसत आहे.
विशेष म्हणजे यासोबतच खास डिझाईन देखील मेंहदीचे बघायला मिळतंय. सर्वांनाच नीता अंबानी यांची मेंहदी आवडल्याचे बघायला मिळतंय. बॉलिवूड कलाकार हे अनंत अंबानीच्या लग्नात धमाल करताना दिसत आहेत. आता या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत.
प्रियांका चोप्रा ही देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी भारतात दाखल झालीये. भारतीय संघाचे अनेक खेळाडू देखील या लग्न सोहळ्यात पोहोचले आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाकडे लागल्याचे बघायला मिळतंय. मुंबईमध्ये राधिका आणि अनंतचा विवाहसोहळा पार पडताना दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List