लग्नासाठी मुलगी मिळेना! ‘लाडका भाऊ योजना’ काढा; भर रस्त्यात उभं राहून तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लग्नासाठी मुलगी मिळेना! ‘लाडका भाऊ योजना’ काढा; भर रस्त्यात उभं राहून तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्य सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेमध्ये महिलांना दीड हजार रुपये महिना मानधन देण्यात येणार आहे. याच धर्तीवर शेतकरी पुत्रांसाठी लाडका भाऊ योजना काढावी, अशी या शेतकरी पुत्राची लक्षवेधी मागणी आहे. भंडारा जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्याने एक फलक हातात घेतला आणि तो थेट गावाच्या चौकात उभा ठाकला. या तरुण शेतकऱ्याकडे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष लागले होते. शेतकऱ्यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, जमले तर ‘लाडका भाऊ’ योजनासुद्धा आणा, अशी  मागणी भंडाऱ्यातील या शेतकरी पुत्राने केली आहे. एखादी योजना काढून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी पुत्रांना दिलासा द्यावा, अशी या तरुणाची मागणी आहे.

भंडारा जिल्ह्यातील जयपाल प्रकाश भांडारकर असे या तरुणाचे नाव असून, तो पदवीचे शिक्षण घेत आहे. जयपाल याच्याकडे सहा एकर स्वतःची शेती असून त्यात तो भात पिकासह, बागायती शेती करून उत्पन्न घेतो. मात्र, शेतकरी पुत्रांना विवाहासाठी मुलीही मिळत नसल्याची खंत या युवा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याने जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;