दोन महिन्यांपूर्वी नायब तहसीलदार, मंडलाधिकारी यांना मारहाण प्रकरण; आरोपी गजाआड

दोन महिन्यांपूर्वी नायब तहसीलदार, मंडलाधिकारी यांना मारहाण प्रकरण; आरोपी गजाआड

दोन महिन्यांपूर्वी जामखेड परिसरात तहसीलदार यांच्या आदेशानुसार गौण खनिजाची आणि अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी 3 एप्रिल रोजी तालुक्यातील पाटोदा शिवारात विनानंबरचा हायवा बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना आढळून आला. तो हायवा तहसील कार्यालयात नेत असताना दोन जणांनी नायब तहसीलदार व मंडलाधिकारी यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील हायवा ट्रक घेऊन पळवला. याप्रकरणी मारहाण व सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असा गुन्हा जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

तहसीलदार गणेश माळी यांचे आदेशानुसार नायब तहसीलदार विजय इंगळे, मंडल अधिकारी नंदकुमार गव्हणे हे गौण खनिजाची आणि अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करत होते. त्यावेळी 3 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास पाटोदा (गरडाचे, ता. जामखेड) गावच्या शिवारात विशाल हॉटेलच्याजवळ पाटोदा ते जामखेड मार्गावर एक विना नंबरचा हायवा ट्रक वाळू चोरी करुन त्याची वाहतूक करत होता. तो हायवा जप्त करून तहसिल कार्यालयाकडे नेत असताना आरोपी अमोल किसन आजबे (रा. जमादारवाडी, ता. जामखेड) यांने हायवा ट्रक अडवुन नंदकुमार गव्हाणे व साक्षीदार हे करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण, धक्काबुक्की करुन त्यांचे ताब्यातील हायवा पळवून नेला.याबाबत नंदकुमार गव्हाणे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या गुन्हयातील आरोपी अमोल किसन आजबे याचा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाणे येथे पोलीस शोध घेत असताना आरोपी चिंचपुर गावचे शिवारात आष्टी येथे एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स. पो. नि. गौतमकुमार तायडे, पोहेकॉ अजय साठे, प्रविण इंगळे, पोलीस शिपाई प्रविण पालवे दिपक बोराटे, ज्ञानेश्वर बेल्हेकर, सचिन पिरगळ चालक आडसुळ यांनी सदर हॉटेलजवळ सापळा लावुन आरोपी अमोल किसन आजबे याला शिताफिने पकडून अटक केली.

त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली. रिमांड कालावधीत आरोपी अमोल आजबे याचेकडुन गुन्हयातील हायवा ट्रक जप्त केला आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा प्रविण इंगळे करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;