हनी सिंगची नवी गर्लफ्रेंड कोण? हुबेहूब दिसते मलायका अरोरा सारखी, फोटो व्हायरल

हनी सिंगची नवी गर्लफ्रेंड कोण? हुबेहूब दिसते मलायका अरोरा सारखी, फोटो व्हायरल

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंग (Yo Yo Honey Singh) फक्त त्यांच्या गाण्यांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. घटस्फोटानंतर हनी सिंग त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील हनी सिंग याचे गर्लफ्रेंडसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनी सिंग याची गर्लफ्रेंड हुबेहूब अभिनेत्री मलायका अरोरा याच्या सारखी दिसते… असं अनेकांचं म्हणणं आहे. ज्या अभिनेत्रीसोबत हनी सिंग याचं नाव जोडलं जात आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून पंजाबची अभिनेत्री हीरा सोहल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हीरा आणि हनी सिंग एकमेकांना गेल्या एक वर्षापासून डेट करत आहेत. हीरा आणि हनी सिंग यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगायचं झालं तर, दोघांची पहिली भेट एका कॉन्सर्टमध्ये झाली होती. हनी सिंग याने होळीसाठी मुंबईत परफॉर्म केलं होतं. त्या कॉन्सर्टमध्ये हीरा देखील उपस्थित होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Heera Sohhal (@heera_sohal)

 

हीरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. हीरा हिला पंजाबती मलायका अरोरा देखील म्हणतात. हीरा हिचा चेहरा मलायकाशी मिळता-जुळता असल्यामुळे तिला मलायका असं देखील म्हणतात. हीरा हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

हीरा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘प्यार है ड्रामा (PHD)’, ‘विक्टोरिया एक रहस्य’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील हीरा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

हनी सिंग याचं पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट…

20 वर्ष रिलेशनशिपनंतर लग्न करत हनी सिंग आणि शालिनी यांनी त्यांच्या नात्याला पती – पत्नीचं नाव दिलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या जवळपास 11 वर्षांनंतर हनी सिंग आणि शालिनी यांनी एक सही करत पती – पत्नीचं नातं संपवलं आहे. आता दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झाले आहेत.

रिपोर्टनुसार, लग्नाआधी हनी सिंग आणि शालिनी यांनी तब्बल 20 वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर दोघांनी 2011 मध्ये पारंपरिक पद्धतील लग्न केलं. आता हनी सिंग अभिन्त्री हीरा हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;