चार महिन्यांआधीच मोबाईल आणि वेबसाईटवरून काढा मेट्रोचे तिकीट

चार महिन्यांआधीच मोबाईल आणि वेबसाईटवरून काढा मेट्रोचे तिकीट

रेल्वेचे तिकीट बुक करताना आता मेट्रोचे तिकीटही काढता  येणार आहे. सध्या दिल्ली मेट्रोपुरती ही सुविधा सुरू झाली आहे. आता दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची क्यूआर कोड आधारित तिकिटे आता आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि मोबाईल अॅपवरही बुक करता येतील. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. त्यांना तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.

मेट्रोची तिकिटे ज्याची वैधता एक दिवसाची होती ती आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून आता 120 दिवस अगोदर बुक करता येतील आणि ते तिकीट चार दिवसांसाठी वैध असेल. तिकिटाची वैधता प्रवासाच्या तारखेच्या आदल्या एका दिवसापासून सुरू होईल. म्हणजे तुम्ही लवकर पोहोचलात किंवा उशिरा पोहोचलात तरी तुमचे पैसे वाया जाणार नाहीत. त्याच मेट्रोच्या तिकिटावर तुम्ही प्रवास करू शकता. जर काही कारणास्तव ट्रेनचे तिकीट रद्द झाले तर मेट्रोचे तिकीट रद्द करता येईल.

l या सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. तिकिटाचे प्रिंट आऊट काढून आपल्याकडे ठेवू शकतात किंवा पह्नमध्ये स्क्रीनशॉट  किंवा तिकीट डाऊनलोड करून सेव्ह करू शकतात.

l ‘वन इंडिया वन तिकीट’ योजनेला प्रोत्साहन देताना प्रवाशांना तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयआरसीटीसी, डीएमआरसी, सेंटर फॉर रेल्वे इर्न्फोमेशन सर्व्हिस एकत्र आले आहेत. दिल्ली मेट्रो रेल्वेचे क्यूआर कोड आधारित तिकिटाचे मोबाईल अॅप बीटा व्हर्जन बुधवारी लाँच करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;