मुलीला वाचवायला गेलेल्या सासू-सासऱ्यांनाच जावयाने संपवले !

मुलीला वाचवायला गेलेल्या सासू-सासऱ्यांनाच जावयाने संपवले !

मुलीला वाचवायला मध्ये पडलेल्या आई-वडिलांचीच जावयाने हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. बनोथू श्रीनू आणि सुगुणा अशी हत्या झालेल्या जोडप्याची नावे आहेत. पत्नी माहेरी येऊन राहत असल्याच्या रागातून पती तिच्या हत्येच्या उद्देशाने सासरवाडीत आला होता. मात्र मुलीला वाचवायला आलेल्या आई-वडिलांनाच जीव गमवावा लागला. तर मुलगी आणि मुलगा जखमी झाले आहेत. वारंगल पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. मेक्काला नागाराजू असे आरोपीचे नाव आहे.

नागाराजू आणि दीपिका यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रेमविवाह झाला होता. नागाराजू हा रिक्षाचालक आहे. नागाराजूच्या रिक्षातून प्रवास करताना त्याची दीपिकासोबत ओळख झाली. मग दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले. पण दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने दीपिकाच्या पालकांचा लग्नाला विरोध होता. दोघेही लग्नानंतर हैदराबाद येथे राहत होते.

लग्नानंतर दोन महिन्यांतच दीपिकाचे मत बदलले आणि ती नागाराजूला सोडून माहेरी आली. दीपिका सोडून गेल्याने नागाराजू अस्वस्थ होता. याच रागातून त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला. बुधवारी रात्री नागाराजू आपल्या सासरवाडीत आला. यावेळी घराच्या बाहेरच्या बाजूला दीपिकाचे आई-वडील झोपले होते.

राजू हातात चाकू घेऊन दीपिकाच्या घरी आला. तो दीपिकाला घरी शोधत असतानाच तिच्या आई-वडिलांना जाग आली. यावेळी नागाराजूसोबत त्यांची झटापट झाली. नागाराजून दोघांवर चाकूने वार केले. यात सुगुणाचा जागीच मृत्यू झाला तर श्रीनूचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागाराजू याने दीपिका आणि तिच्या भावावरही हल्ला केला. मात्र घरातील आरडोओरडा ऐकून शेजाऱ्यांना जाग आली. शेजाऱ्यांनी दीपिकाच्या घराकडे धाव घेताच नागाराजूने तेथून पळ काढला. यामुळे दीपिका आणि तिच्या भावाचे प्राण वाचले. वारंगल पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;