सोनाक्षी सिन्हासोबत भावांनी मोडले सर्व संबंध? माहेर – सासर आलं एकत्र, भाऊ मात्र गायब

सोनाक्षी सिन्हासोबत भावांनी मोडले सर्व संबंध? माहेर – सासर आलं एकत्र, भाऊ मात्र गायब

‘दबंग’ फेम अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं आहे. तब्बल सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीलग्नाचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. झहीर याच्यासोबत लग्न केल्यामुळे सोनाक्षी प्रचंड आनंदी आहे. आता देखील सोनाक्षी हिचा एका फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सोनाक्षी हिच्यासोबत माहेर आणि सासरची मंडळी देखील दिसत आहेत.

सांगायचं झालं तर, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पत्नी पूनम सिन्हा यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी दोन्ही कुटुंबं एकत्र आले होते. फोटोमध्ये दिग्दर्शक सुभाष घाई देखील दिसत आहेत. त्यांनीच सिन्हा आणि इक्बाल कुटुंबासोबत क्लिक केलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by SG (@subhashghai1)

 

सुभाष घाई खास फोटो पोस्ट करत म्हणाले, माझा पहिला मित्र आणि मुंबईतील पहिला हिरो… पूनम माझी मानलेली बहीण आहे. तिच कन्यादान मी केला आहे…’ सध्या फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम 9 जुलै 1980 विवाहबंधनात अडकले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदाच्या क्षणी सोनाक्षीचे सासरे इक्बाल रतनसी देखील उपस्थित होते.

सिन्हा आणि इक्बाल कुटुंबियांनी मिळून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पत्नी पूनम सिन्हा यांच्या लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा केला. पण यावेळी सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश दिसले नाहीत. आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लव याने देखील फोटो पोस्ट केला. पण त्यामध्ये सोनाक्षी नव्हती. त्यामुळे भाऊ – बहिणीच्या नात्यात कटूता असल्याचं स्पष्ट होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 

सांगायचं झालं तर, सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नात देखील भाऊ उपस्थित नव्हते. ज्यामुळे तुफान चर्चा रंगली होती. शिवाय लव सतत सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट देखील करत होता. सध्या सर्वत्र सिन्हा कुटुंबाच्या खासगी गोष्टी सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;