नेपाळमध्ये भीषण दुर्घटना; दोन बस नदीत वाहून गेल्या, 63 प्रवासी बेपत्ता

नेपाळमध्ये भीषण दुर्घटना; दोन बस नदीत वाहून गेल्या, 63 प्रवासी बेपत्ता

नेपाळमध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. पावसामुळे भीषण दुर्घटना नेपाळमध्ये घडली आहे. भूस्खलनामुळे दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या आहेत. दोन्ही बसमधील चालक आणि प्रवासी मिळून एकूण 63 जण या बसेसमध्ये वाहून गेले आहेत. प्रशासनाकडून सर्वांचा शोध सुरु आहे. शुक्रवारी पहाटे 3.30 वाजता ही दुर्घटना घडली. मदन-आश्रित राज्यमार्गावर भूस्खलन झाल्याने ही घटना घडली. सदर बस बीरगंडहून काठमांडूला चालली होती.

घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी हजर दाखल झालो आहोत. शोध मोहिम सुरु हाती घेतली आहे. मात्र पावसामुळे शोध मोहिमेत अडथळा येत आहे, अशी माहिती चितवनचे मुख्य जिल्हाधिकारी इंद्रदेव यादव यांनी दिली. दरम्यान, खराब हवामानामुळे काठमांडू ते भरतपूर, चितवन येथील सर्व उड्डाणे आजसाठी रद्द करण्यात आली आहेत.

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. “नारायणगड-मुग्लिन रोडवर झालेल्या भूस्खलनात बस वाहून गेल्याने सुमारे पाच डझन प्रवासी बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे तसेच पूर आणि भूस्खलनामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्याने मला खूप दुःख झाले आहे. मी गृह प्रशासनासह सरकारच्या सर्व यंत्रणांना प्रवाशांचा शोध घेण्यासाठी प्रभावी मोहिम राबवण्याचे निर्देश देतो.” असे दहल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;