सभागृहाला खोटी माहिती दिली! उद्योगमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव, रस्ते घोटाळय़ाची एसआयटी चौकशीची मागणी

सभागृहाला खोटी माहिती दिली! उद्योगमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव, रस्ते घोटाळय़ाची एसआयटी चौकशीची मागणी

मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला उशीर लावल्याप्रकरणी रोडव्हेज सोल्युशन या कंपनीला काळय़ा यादीत टाकून 64 कोटींचा दंड ठोठावण्यात आला, ही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेली माहिती खरी नाही. प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नाही, असा दावा करत शिवसेनेचे अनिल परब यांनी उदय सामंत यांच्याविरोधात विधान परिषदेत आज हक्कभंगाचा प्रस्ताव दिला. दरम्यान, सर्व रस्ते घोटाळय़ांची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणीही परब यांनी केली.

विधान परिषदेत मुंबईतील रस्त्यांची काँक्रीटीकरणाच्या कामात होत असलेला विलंब आणि अनियमिततेवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे यांच्यासह विरोधकांनी बुधवारी कडाडून हल्ला चढवला. विरोधकांच्या प्रश्नांना उद्योगमंत्र्यांनी उत्तर दिले होते. याबाबत अनिल परब यांनी 260 चा प्रस्ताव मांडत  उद्योगमंत्र्यांनी सभागृहाला चुकीची आणि खोटी माहिती देऊन सभागृहाची फसवणूक केली आहे. म्हणून विरोधकांच्या वतीने हक्कभंग प्रस्ताव तालिका सभापती मनीषा कायंदे यांच्याकडे दिला.

हाअधिकारी निवडणुकीचा महसूल गोळा करत असतो

सुधाकर शिंदे यांना मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नेमले आहे. हा अधिकारी मनमानी करत आहेत. महापालिकेच्या तिजोरीतून 37 कोटी रुपये लोकसभा प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते त्यावेळी वापरला गेला. हा अधिकारी आयआरएस आहे, हा आयएएस नाही. हा अधिकारी निवडणुकीचा महसूल गोळा करत असतो, असा आरोपही परब यांनी केला.

हा इलेक्शन फंडचा घोटाळा आहे 

हे सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे. शत्रूला वाटते आपण हरतो तेव्हा संपूर्ण राज्य उद्ध्वस्त करून टाकायचे अशी स्थिती या सरकारची आहे. जे प्रकल्प मंजूर झाले आहेत, ते वर्कऑर्डर देऊन टाकायचे आणि त्यातून कमिशन घेऊन हेच पैसे उद्या निवडणुकीला वापरले जाणार आहेत. ज्या ज्या गोष्टीचे टेंडर काढण्यात आले त्यामध्ये वाढीव किंमत लावण्यात आली आणि वरचा पैसा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. हा इलेक्शन फंडचा घोटाळा आहे, असा आरोप अनिल परब यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;