गोरेगाव-मुलुंड रोडमुळे सवा तासाचा प्रवास 25 मिनिटांत; नॅशनल पार्कखालील 4.7 किमीच्या बोगद्याचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

गोरेगाव-मुलुंड रोडमुळे सवा तासाचा प्रवास 25 मिनिटांत; नॅशनल पार्कखालील 4.7 किमीच्या बोगद्याचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या आणि पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे सवा तासाचा प्रवास अवघ्या 25 मिनिटांत होणार आहे. 12.20 किमी एकूण लांबीच्या या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात नॅशनल पार्पखालून 4.7 किमी अंतराचा जुळा बोगदा तयार करण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, 13 जुलै रोजी होणार आहे. सायंकाळी 5 वाजता गोरेगाव नेस्को सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्प एपूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची एपूण लांबी 12.20 किलोमीटर आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे एपूण 14 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे.

असा आहे जुळा बोगदा

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7 किलोमीटर लांब आणि 45.70 मीटर रुंदीचा जुळा बोगदा करणार.

लिंक रोड आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एपूण लांबी 6.65 किलोमीटर राहणार. हा जुळा बोगदा जमिनीखाली 20 ते 160 मीटर खोल भागात असेल.

प्रत्येकी 300 मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील. यासाठी सुमारे 14.2 मीटर व्यासाच्या बोगदा खोदण्याच्या संयंत्राने (टीबीएम) होणार बोगद्याचे खोदकाम.

असा होणार फायदा

या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल. त्यामुळे वाहतूककोंडीपासून दिलासा मिळणार.

या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडरस्ता उपलब्ध होणार.

नाशिक महामार्गावर जाणाऱ्या वाहनांनाही या प्रकल्पामुळे फायदा. जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे 8.80 किलोमीटरने कमी होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;