जगात सर्वाधिक आत्महत्या हिंदुस्थानात, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा धक्कादायक अहवाल

जगात सर्वाधिक आत्महत्या हिंदुस्थानात, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा धक्कादायक अहवाल

नुकतेच भाईंदर रेल्वेस्टेशनवर वडिल -मुलाच्या आत्महत्येनंतर मुंबई हादरली असताना आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील सर्वांधिक आत्महत्या हिंदुस्थानात झाल्या आहेत . एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, 2022 मध्ये हिंदुस्थानात 1.71 लाख लोकांचा आत्महत्या केल्या.  हिंदुस्थानातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक संख्या आहे.

याबाबत आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आत्महत्येमागील महत्वाचे कारण नैराश्य आहे. हा एक मानसिक आजार असून  आत्महत्येमागे तणाव हे कारण असू शकते. याबाबत नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील सायकॅट्री अॅण्ड बिहेविअरल सायन्सचे उपाध्यक्ष राजीव मेहता यांनी दिली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तणावामागील महत्वाचे कारण नोकरी, पैसे, नात्यांमधील तणाव आणि आरोग्य ही महत्वाची कारणे आहेत. या कारणांमुळे आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांमुळे तणाव निर्माण होतो आणि तो तणाव टोकाला पोहोचला की नैराश्य येते आणि त्यातून आत्महत्येसारख्या घटना घडतात. आत्महत्या केलेल्या लोकांपैकी 50 ते 90 टक्के लोकं नैराश्य, चिंता आणि आजार असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.

आत्महत्या हे हिंदुस्थानासमोरील सर्वात मोठे सार्वजनिक आरोग्य संकट आहे. तरुणांमधील आत्महत्येमागील महत्वाचे कारण आहे. अत्यंत तणावाच्या काळात आत्महत्या आवेगाने होऊ शकतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;