Ratnagiri News : 50 हजारांची लाच मागणारा मुख्य लिपीक ACB च्या जाळ्यात

Ratnagiri News : 50 हजारांची लाच मागणारा मुख्य लिपीक ACB च्या जाळ्यात

सावकारीच्या परवान्याचे काम करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणारा मुख्य लिपीक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रंगेहात जाळ्यात सापडला आहे. ही कारवाई आज सकाळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक रत्नागिरी कार्यालयात करण्यात आली.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक रत्नागिरी कार्यालयातील मुख्य लिपीक विनायक भोवड, वय 57 याने तक्रारदाराकडे सावकारी परवान्याचे काम करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच त्याने स्वतःसाठी आणि डीडीआर कार्यालयाला देण्यासाठी मागितली होती. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या आधारवर आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास मुख्य लिपीक विनायक भोवड यांना लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरिक्षक अनंत कांबळे, संदीप ओगले, संतोष कोळेकर, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, हेमंत पवार, राजेश गावकर यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;