शत्रुघ्न सिन्हा यांना जावायाने दिले मोठे गिफ्ट, सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी लग्नानंतर…

शत्रुघ्न सिन्हा यांना जावायाने दिले मोठे गिफ्ट, सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी लग्नानंतर…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाक्षी सिन्हा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनाक्षी सिन्हाने मुंबईमध्ये झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. लग्न झाल्यापासून सोनाक्षी सिन्हा ही सतत चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाने एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, तिला तिच्या आई वडिलांच्या घरीची आठवण येत आहे.

नुकताच शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. दोघांनी आपला 44 वा वाढदिवस साजरा केला. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियावरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दिल्या जात होत्या. मुलगा लव सिन्हा यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई वडिलांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांना जावई झहीर इक्बाल याने या दिवशी मोठे सरप्राईज दिले. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या घरी शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जावई झहीर इक्बाल याच्याकडून शत्रुघ्न सिन्हा यांना मोठे सरप्राईज मिळाले.

शत्रुघ्न सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्यामध्ये खास नाते तयार झाल्याचे देखील सांगितले जाते. हेच नाहीतर लग्नामध्येही जावायासोबत बॉन्ड शेअर करताना शत्रुघ्न सिन्हा हे दिसले. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नात अनेक हिंदू रितीरिवाज देखील पार करण्यात आले. एका फोटोमध्ये जावायाला आणि मुलीला आर्शिवाद देताना शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम या दिसल्या.

शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. शत्रुघ्न सिन्हा यांच्यानंतर सोनाक्षी सिन्हाने देखील बॉलिवूडमध्ये मोठा धमाका केलाय.  सोनाक्षीचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे सोनाक्षीचे हे चित्रपट धमाका करतात. सोनाक्षी सिन्हा ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;