Anant Ambani Wedding : एकदम रॉयल लग्न, अंबानींनी खास ‘या’ देशातून मागवला फोटोग्राफर
देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात उद्या 12 जुलै रोजी शुक्रवारी मंगल कार्य आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचं लग्न आहे. हा विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जियो वर्ल्ड प्लाजामध्ये हे लग्न होणार आहे. अंबानींच्या घरातलं लग्न कार्य असल्याने राजकारण, सिनेमा, क्रीडा, उद्योग व अन्य क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अंबानींच्या मुलाच लग्न असल्याने मुंबईतील अनेक मोठी हॉटेल्स जवळपास पूर्णपणे बुक झाली आहेत. BKC मधील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे. कारण वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उद्या मोठा सुरक्षा बंदोबस्त असेल. त्याशिवाय वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात येतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण सोपं नसेल.
12 जुलै 2024 रोजी होणाऱ्या अनंत-राधिकाच्या लग्नाच सेलिब्रेशन आधीच सुरु झालय. अंबानी कुटुंबाच्या या ग्रँड फंक्शनमध्ये देश-विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित राहतील. त्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. BKC मधील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 15 जुलै पर्यंत वर्क फ्रॉम होम दिलं आहे.
खास पाहुणे कोण?
अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्यासाठी मुकेश अंबानी यांनी जगभरातील दिग्गजांना निमंत्रित केलं आहे. यात बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चनपासून अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, अन्य राजकीय नेते उपस्थित राहतील. त्याशिवाय परदेशातूनही काही खास पाहुणे या लग्नाला येणार आहेत. यात डेविड बेकहम आणि विक्टोरिया बेकहम सारखे पाहुणे आहेत.
प्रायवेट जेटची व्यवस्था
या ग्रँड वेडिंग फंक्शनमधील आयुष्यभर लक्षात राहणारे क्षण कैद करण्यासाठी लॉस एंजिल्सवरुन एक टॉप लेवलच्या फोटोग्राफर आणि कॅमेरा पर्सनला बोलवण्यात आलं आहे. परदेशी पाहुण्यांसाठी मुकेश अंबानी यांनी प्रायवेट जेटची व्यवस्था केली आहे. त्याशिवाय पाहुण्यांच्या थांबण्यासाठी मुंबईत आईटीसी (ITC), ललित (Hotel Lalit) आणि ताज (Taj Hotel) सारख्या हॉटेल्समध्ये बुकिंग करण्यात आलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List