Ratnagiri News : शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीला यश, एसटी बस सेवा सुरू
देवगड तालुक्यातील कुवळे, भरणी, तांबळवाडी, आणि कोवळे या मार्गावर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत होते. शिवसेसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे या भागातील विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीला यश आले आणि सदर फेरी सुरू करण्यात आली.
भरणी या गावातून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी एसटी बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहतुकीने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुले कुवळे, भरणी, तांबळवाडी आणि कोवळे या मार्गावर एसटी बस सुरू करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून होत होती. या प्रकरणी गंभीर दखल घेत शिवसेना युवा जिल्हा प्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांची भेट घेत तात्काळ फेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले असून आठ जुलैपासून एसटीची फेरी या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List