पुराचं पाणी अचानक वाढलं अन् वृद्ध व्यक्ती 4 तास झाडावरंच लटकली, मध्यरात्री बचाव पथकानं काढलं बाहेर
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथे एक वृद्ध व्यक्ती पुरामुळे चक्क चार तासांहून अधिक काळ झाडावरच लटकली होती. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) झाडावर लटकलेल्या या वृद्धाची मध्यरात्री सुटका केली.
बनबासा बॅरेजमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने शारदा नदीला पूर आला. परशुराम नावाची एक वृद्ध व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती स्थानिकांनी एनडीआरएफ टीमला दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी एक टीम पाठवली आणि त्यांनी गुरुवारी पहाटे दोन वाजता या गावकऱ्याची सुखरूप सुटका केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List