‘हिरामंडी’च्या अभिनेत्याला सेक्सचं व्यसन; स्वत:च केला खुलासा

‘हिरामंडी’च्या अभिनेत्याला सेक्सचं व्यसन; स्वत:च केला खुलासा

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये अभिनेता जेसन शाहने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. जेसन यामध्ये इंग्रज पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. या सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेल्या जेसनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. या मुलाखतीत जेसनने त्याच्या ‘सेक्स ॲडिक्शन’विषयी खुलासा केला. “मला दारू आणि धुम्रपानाचं व्यसन होतंच. पण माझ्यासाठी शरीरसुखाचं व्यसन सर्वांत कठीण होतं”, असं तो म्हणाला. या व्यसनाची जाणीव त्याला काही वर्षांपूर्वी झाली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला अध्यात्मिक परिवर्तनाची मदत झाली, असंही त्याने सांगितलं.

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जेसन त्याच्या व्यसनांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. तो म्हणाला, “मला दारूचं व्यसन होतं. मी दिवसाला दोन ते अडीच सिगारेटची पाकिटं संपवायचो. मी हे निश्चितच सांगू शकतो की मला महिलांचंही व्यसन होतं. सेक्स ॲडिक्शन माझ्यासाठी सर्वांत कठीण होतं. ते व्यसन सोडणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. सर्वाधिक वेळ त्यालाच लागला. मात्र अध्यात्माच्या साहाय्याने मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. देवावरील प्रेमामुळेच हे शक्य झालं. पण ते इतकं सोपं नव्हतं. नाही म्हणणंच माझ्यासाठी खूप कठीण होतं. एखाद्या गोष्टीतून तुम्हाला सुख मिळत असेल तर ते का करू नये, असा माझा विचार होता. पण नंतर मला याची जाणीव झाली की हा सर्वांत वाईट सल्ला असेल. पण आता एखादी गोष्ट चांगली वाटत असेल तर त्याबद्दल मी दोनदा विचार करतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by @jasonshah

“मी माझ्या मित्राच्या घरी होतो. ठरल्याप्रमाणे ती गोष्ट झाल्यानंतर मुलगी घरातून जात होती. तिचं मन दुखावल्याबद्दल मला खूप वाईट वाटलं होतं. मला माझीच लाज वाटत होती. माझ्या मनात अपराधीपणाची भावना होती. माझं मन पोकळ झालं होतं. त्यानंतर मी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. तिथूनच माझ्यातील बदलाला सुरुवात झाली. सध्या मी ज्या मुलीला डेट करतोय, तिलासुद्धा मी हे स्पष्ट केलंय की लग्न होईपर्यंत आपण सेक्स करायचं नाही. हा बदल माझ्यासाठी चांगला आहे”, असं तो पुढे म्हणाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;