ठरलं तर…कोण कितव्या मजल्यावर राहणार; वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प

ठरलं तर…कोण कितव्या मजल्यावर राहणार; वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प

म्हाडाकडून 842 चाळकऱ्यांच्या सदनिकांची निश्चिती
म्हाडातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱया पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र चाळकऱयांना वितरित करावयाच्या 842 पुनर्वसन सदनिकांची नुकतीच निश्चिती करण्यात आली. इमारत क्रमांक 1 मधील बी, एफ आणि एच विंगमध्ये या चाळकऱयांची सदनिका निश्चिती करण्यात आली असून डिसेंबर 2025 पर्यंत सदनिकांचा ताबा देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम महाविकास आघाडीच्या काळात सुरु झाले. म्हाडाच्या माध्यमातून वरळीच्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मे. टीसीसी कन्स्ट्रक्शन पंपनीमार्फत वरळीतील 121 चाळींचा पुनर्विकास करून 9689 सदनिका उभारण्यात येणार आहे. याअंतर्गत आता वरळी बीडीडीतील 18, 19, 20, 59, 60, 61, 78, 79, 80, 81 आणि 82 या अकरा चाळींमध्ये वास्तव्यास असलेल्या 842 पात्र चाळकऱयांची म्हाडातर्फे सदनिका निश्चिती करण्यात आली आहे.

नव्या इमारतीचा श्रीगणेशा
सदनिकांची निश्चिती झाल्यानंतर आता या चाळकऱयांसोबत करार केला जाईल. त्यानंतर चाळकऱयांना भाडय़ाचा किंवा संक्रमण शिबिराचा पर्याय देऊन अकरा चाळी रिक्त केल्या जातील. 18, 19, 20 या चाळींच्या जागेवर कमर्शियल तर इतर आठ चाळींच्या जागेवर पुनर्वसन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;