कोस्टल रोडचा आणखी 3.5 किमी मार्ग आजपासून मुंबईकरांच्या सेवेत

कोस्टल रोडचा आणखी 3.5 किमी मार्ग आजपासून मुंबईकरांच्या सेवेत

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱया धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचा आणखी 3.5 किमी मार्ग उद्या 11 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत खुला करण्यात येणार आहे. या मार्गावरून पुढे 300 मीटर अंतरावरून वरळी सी लिंकवरही जाता येणार आहे. यामुळे हाजी अली ते वरळीपर्यंतचे बिंदुमाधव ठाकरे चौक, मेला हॉटेल आणि लोटस जेट्टी असे तीन सिग्नल वाचवून वरळी सी लिंकवर जाता येणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेला ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ सागरी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून 91 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. या मार्गात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कोस्टल रोड महाकाय पुलाच्या माध्यमातून वरळी सी लिंकला जोडला जाणार आहे. हे काम सध्या प्रगतिपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राइव्ह ते वांद्रे असा पाऊस तासाचा प्रवास अवघ्या 12 मिनिटांत होणार आहे.

असे होतेय काम
– कोस्टल रोड प्रकल्पात (दक्षिण) प्रकल्प प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे.
– नागरिकांच्या सुविधेसाठी प्रकल्पामधील पूर्ण झालेल्या कामाचे टप्याटप्याने लोकार्पण करण्यात आले.
– बिंदुमाधव ठाकरे चौक (वरळी) ते मरीन ड्राईव्ह ही दक्षिणवाहिनी मार्गिका 11 मार्च 2024 पासून खुली करण्यात आली आहे.
– उत्तर दिशेने जाणाऱया मार्गिकेचे मरीन ड्राइव्ह ते हाजी अली मार्गे लोटस जंक्शनपर्यंत 10 जून रोजी लोकार्पण करण्यात आले आहे.

असा करा प्रवास…
– आता हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा उत्तर दिशेने जाणारा साधारण 3.5 कि.मी. मार्ग खुला केला जाईल.
– सदर मार्गिकेवरून फक्त सी-लिंकला जाता येईल. वरळी व प्रभादेवी परिसरात जाण्यासाठी डॉ. अॅनी बेझंट मार्ग व खान अब्दुल गफार खान मार्ग या नेहमीच्या रस्त्यांचा वापर करावा लागेल.
– त्यामुळे मरीन ड्राइव्हपासून कोस्टल रोडवरून खान अब्दुल गफार खान मार्गावरून फक्त सी-लिंकला जाणे शक्य होणार आहे.
– तसेच लोटस जंक्शनवरून सी लिंकला जाण्याकरिता आंतरबदलातील एक मार्गिका (आर्म-8) सुरू करण्यात येत आहे.
– 11 जुलैपासून वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणाऱया सदर मार्गिका सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 ते रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच शनिवारी व रविवारी बंद राहतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;