वीज दरवाढ, स्मार्ट प्रिपेड मीटर योजना रद्द करा! काँग्रेसचा आज अदानीविरोधात मोर्चा
राज्य सरकारने वीज दरवाढ करून सर्वसामान्यांचे पंबरडे मोडले आहे. ही दरवाढ 7 टक्के असली तरी प्रत्यक्षात मात्र ही दरवाढ 30 टक्के आहे. वीज दरवाढीबरोबरच सरकारने अदानीचे खिसे भरण्यासाठी स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे दिवाळे निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वीज दरवाढ आणि स्मार्ट मीटर योजना रद्द करा, या मागणीसाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने गुरुवारी दोन वाजता बीकेसीतील अदानी कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबईतील सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या पिळवणुकीविरोधात आयोजित करण्यात आलेला मोर्चा महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या, स्मार्ट मीटरला जनतेचाही तीव्र विरोध असून केवळ अदानीचे खिसे भरण्यासाठी सरकारने स्मार्ट प्रिपेड मीटर आणले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List