पुण्यात महावितरण कार्यालयात; शिरला बिबटय़ा… धावाधाव, पळापळ

पुण्यात महावितरण कार्यालयात; शिरला बिबटय़ा… धावाधाव, पळापळ

खेड, जुन्नर, शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात बिबटय़ांचा मानवी वस्तीवरील वावर वाढला आहे. नेहमी नागरिकांची वर्दळ असलेल्या खेड तालुक्यातील चांडोली येथील महावितरणच्या कार्यालयात शिरलेल्या बिबटय़ाने साऱयांच्या काळजाचे ठोके चुकवले. महावितरणला ‘शॉक’ देणाऱ्या या बिबटय़ाला कर्मचाऱयांनी एका खोलीत कोंडून ठेवले.

चांडोली वीज उपपेंद्राच्या पाठीमागील बाजूस असलेल्या सम्राट हाऊसिंग सोसायटीच्या परीसरात गेल्या शनिवारी सायंकाळी बिबटय़ा आढळून आला होता. रविवारीही तो परिसरात वावरत होता. बुधवारी महावितरणच्या आवारात भरदिवसा वीज मीटर टेस्टिंग इमारतीत बिबटय़ा शिरला. टेस्टिंग खोलीत वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके काम करीत बसल्या होत्या. त्यांच्या खुर्चीमागून जात बिबटय़ा एका कोपऱयात जाऊन बसला. याची कल्पना कर्मचाऱयांनी दिल्यानंतर शांता शेळके लागलीच उठून बाहेर आल्या आणि त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला. त्यांनी याची माहिती वरिष्ठ सिद्धार्थ सोनवणे यांना दिली. वन क्षेत्रपाल प्रदीप रौधंळ यांना याबाबत माहिती देण्यात आल्यावर बिबटय़ाला पकडण्यासाठी तयारी करण्यात आली. जुन्नर रेस्क्यू टीम दाखल झाली. बिबटय़ाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कर्मचाऱयांनी काsंडून ठेवलेल्या या मादी बिबटय़ाला जुन्नर वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जेरबंद करून माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;