वेसावेतील दोन अनधिकृत इमारतींवर बुलडोझर; 3 जूनपासून सात इमारती जमीनदोस्त

वेसावेतील दोन अनधिकृत इमारतींवर बुलडोझर; 3 जूनपासून सात इमारती जमीनदोस्त

मुंबईतील अनधिकृत बांधकामांविरोधात पालिकेने धडक कारवाई केली असून वेसावेतील दोन इमारतींवर आज बुलडोझर चालवण्यात आला. 3 जूनपासून पालिकेने या ठिकाणच्या सात इमारतींवर तोडक कारवाई केली आहे. तर लवकरच आणखी सात ते आठ अनधिकृत इमारतींवर कारवाई केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वेसावे भागात पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या दलदलीच्या प्रदेशावर आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (सीआरझेड) उद्भवलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येत आहे. 3 जूनपासून वेसावे गाव (शिवगल्ली) भागातील अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई सुरू असून आतापर्यंत या भागातील सात इमारती निष्कासित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तळमजला आणि तीन मजली, चार मजली तसेच पाच मजली अशा स्वरूपाच्या इमारतींचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;