युवासेनेच्या युवती विभागीय सचिव व विस्तारक पदांकरिता मुलाखती
युवासेनेच्या युवती विभागीय सचिव व विस्तारक या पदांकरिता नेमणुका करण्यात येणार असून त्याकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. विस्तारक या पदाकरिता रविवार, 14 जुलै रोजी तर विभागीय सचिव या पदाकरिता शनिवार, 20 जुलै रोजी मुलाखत घेण्यात येईल. दोन्ही मुलाखती ठरलेल्या दिवशी दुपारी 2 ते 5 या वेळेत शिवसेना भवन, दादर येथे होतील.
सदर पदांकरिता पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे. तसेच येताना आपले पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावे. इच्छुक पदाधिकाऱयांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
अशी आहे पात्रता
n विभागीय सचिव या पदासाठी मुंबईव्यतिरिक्त विस्तारक, सहसचिव तसेच जिल्हास्तरीय युवती पदाधिकारी मुलाखती देऊ शकतील.
n विस्तारक या पदासाठी युवासेनेतील मुंबई विभागातील विधानसभापर्यंत तसेच जिह्यातील तालुका युवती अधिकारी पदापर्यंत असणाऱया सर्व युवती पदाधिकारी मुलाखत देऊ शकतील.
n विभागीय सचिव व विस्तारक पदासाठी इच्छुक युवती संघटनेत किमान तीन वर्षे सक्रिय असणे आवश्यक आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List