53 व्या वर्षी सैफ अली खानची फिटनेस पाहून बेबो ही स्वत:ला रोखू शकली नाही

53 व्या वर्षी सैफ अली खानची फिटनेस पाहून बेबो ही स्वत:ला रोखू शकली नाही

करीना कपूर खान काही दिवसांपूर्वीच युरोपवरुन परतली आहे. परतल्यानंतर अभिनेत्री सतत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत आहे. अभिनेत्रीने सैफचा शर्टलेस फोटो शेअर केला आहे जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सैफ खांबाजवळ उभा असताना किलर पोज देताना दिसत आहे. त्याचं वय लक्षात घेता त्यांच्या फिटनेसची यामुळे चर्चा होत आहे.

सैफ अली खानचा हा फोटो युरोप ट्रिपचा आहे. या फोटोत तो पोज देताना दिसत आहे. त्याचे ऍब्स तो दाखवत आहे. डोक्यावर टोपी घातली आहे. करिनाने स्वतः हा फोटो ही तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यावर लोक कमेंट करत आहेत. अभिनेत्याच्या फिटनेसची ती प्रशंसा करत आहे.

करिनाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की – ‘डॅडी ओ… समर 2024.’ या फोटोला लाखो लोकांनी लाईक केले आहे. करिनाने याआधी तिचा बिकिनी फोटो शेअर केला होता. हा एक मिरर सेल्फी होता ज्यामध्ये करीना हिरव्या रंगाच्या बिकिनीवर शर्ट घालून स्वतःचा फोटो क्लिक करताना दिसली होती. या फोटोमध्ये, अभिनेत्रीने तिच्या चेहऱ्यावर गॉगल घातला होता आणि केसांना वर करून उंच अंबाडा बनवला होता.

प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर सैफ अली खान शेवटचा ‘आदिपुरुष’मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसला होता. तर करिना नुकतीच ‘क्रू’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात करीनासोबत तब्बू आणि क्रिती सेनन होती. मात्र या चित्रपटाला चांगला प्रतिसाद नाही मिळाला. या चित्रपटाचे प्रमोशन करीना आणि इतर स्टार्सनी जोरदार केले होते. पण टीमला अपेक्षित असे कलेक्शन हा चित्रपट करू शकला नाही. सध्या करिनाचा आगामी चित्रपट ‘द बकिंघम मर्डर्स’ आहे जो यावर्षी 13 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;