25 दिवसांच्या संन्यासानंतर ‘तारक मेहता..’च्या अभिनेत्याला करायचंय लग्न

25 दिवसांच्या संन्यासानंतर ‘तारक मेहता..’च्या अभिनेत्याला करायचंय लग्न

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टीव्ही इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता झाला होता. 22 एप्रिल रोजी त्याच्या बेपत्ता झाल्याच्या बातमीने सर्वांनाच हैराण केलं होतं. जवळपास 25 दिवसांपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. कुटुंबीय, सहकलाकार, नातेवाईक, मित्रपरिवार.. सर्वांनीच त्याच्याविषयी चिंता व्यक्त केली होती. अखेर अचानक एकेदिवशी तो सुखरुप घरी परतला. या सर्व घटनेबाबत गुरुचरणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडलं आहे. त्याचसोबत त्याने आता लग्न करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण म्हणाला, “कोविड महामारीनंतर अनेक गोष्टींनी मी प्रभावित झालो होतो. 2020 मध्ये मी मुंबई सोडून वडिलांसोबत राहू लागलो. त्याचदरम्यान वडिलांचीही सर्जरी होती. तिथे मी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात मला यश मिळालं नाही. व्यवसायात एकतर काम चांगलं झालं नव्हतं आणि ज्या लोकांनी माझ्यासोबत मिळून तो व्यवसाय सुरू केला, ते नंतर गायब झाले. त्यांनी माझी फसवणूक केली होती. त्यातच प्रॉपर्टीवरूनही कुटुंबीत वाद सुरू होते. त्यात माझा बराच पैसा खर्च झाला होता. या सर्व कारणांमुळे मला बऱ्याच आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं.”

“आर्थिक समस्यांमुळे मी खूप त्रस्त झालो होतो. आईवडिलांच्या प्रभावामुळे मला नेहमीच अध्यात्मात रस होता. त्यामुळे जेव्हा माझ्या आयुष्यातील अत्यंत पडता काळ सुरू होता, तेव्हा मी अध्यात्मचा मार्ग स्वीकारला आणि जवळपास 25 दिवस मी एखाद्या संन्यासीप्रमाणे राहू लागलो होतो. मला परत यायचंच नव्हतं. मात्र देवाच्या संकेतामुळेच मी पुन्हा आलो. परत आल्यानंतर मी कोणाला मुलाखत दिली नव्हती. पण लोकांचा गैरसमज दूर व्हावा म्हणून मी ही मुलाखत देतोय. माझं सर्व कर्ज फेडण्यासाठी मी पूर्ण मेहनत करायला तयार आहे. सध्या माझ्या हाती काहीच काम नाही. मी पुन्हा काम करून माझं सर्व कर्ज फेडू इच्छितो. त्यानंतर मला संसार थाटायचा आहे. मला लग्न करायचं आहे”, अशी इच्छा त्याने पुढे बोलून दाखवली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;