Bigg Boss OTT 3 फेम अरमान मलिक आणि दोन पत्नींमध्ये किती वर्षांचं अंतर?

Bigg Boss OTT 3 फेम अरमान मलिक आणि दोन पत्नींमध्ये किती वर्षांचं अंतर?

युट्यूबर अरमान मलिक विवादीत टी.व्ही शो ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये दोन्ही पत्नींसोबत स्पर्धक म्हणून उपस्थित झाला होता. ‘बिग बॉस’मध्ये आल्यापासून अरमान मलिक आणि त्याच्या कुटुंबाच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ देखील झाली. सोशल मीडियावर देखील तिघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अरमान मलिक यांच्या पहिल्या पत्नीचं नाव पायल मलिक तर दुसऱ्या पत्नीचं नाव कृतिका मलिक असं आहे.

आता तिघांच्या वयाची चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे. अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींपेक्षा मोठा आहे. अरमान मलिक याचं वय 35 वर्ष आहे. त्याचा जन्म 15 डिसेंबर 1988 साली झाला. अरमान याची पहिली पत्नी पायल मलिक हिचा जन्म 19 डिसेंबर 1094 मध्ये झाला होता. आता पायल 30 वर्षांची आहे. तर कृतिका देखील 30 वर्षांची आहे 20 मार्च 1994 रोजी कृतिका हिचा जन्म झाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

 

सांगायचं झालं तर, अरमान आणि त्याच्या दोन पत्नी पायल – कृतिका यांच्या वयात 6 वर्षांत अंतर आहे. अरमान मलिक याच्या कुटुंबाबद्दल सांगयचं झालं तर, अरमान आण पायल यांना तीन मुलं आहे. गेल्या वर्षी पायल हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. कृतिका हिने देखील 2023 मध्ये एका मुलाला जन्म दिला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Payal Malik (@payal_malik_53)

 

अरमान मलिक याने दोन्ही पत्नींच्या प्रेग्नेंसी घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. ज्यामुळे तिघांना ट्रोल देखील करण्यात आलं. सोशल मीडियावर अरमान, पायल, कृतिका कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर सतत तिघांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असते.

सांगायचं झालं तर, दोन्ही पत्नींंसोबत अरमान याचं लव्ह मॅरिज आहे.पायल हिने कुटुंबियांच्या विरोधात जावून 2011 मध्ये अरमान याच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर पायल हिने मुलगा चिरायू याला जन्म दिला.

त्यानंतर 2018 मध्ये अरमान याने पायल हिला घटस्फोट न देता कृतिका हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. 2022 मध्ये अरमान याने दोन्ही पत्नी गरोदर असल्याची घोषणा केली. अरमान याला चार मुलं आहेत. चिरायू, तूबा, अयान आणि झैद… अशी अरमान याचा मुलांची नावे आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;