‘बाई गं’… पाच जन्माच्या बायकांपासून पिच्छा सोडवणाऱ्या नवऱ्याची तारंबळ; स्वप्निल-प्रार्थना येताहेत प्रेक्षकांच्या भेटीला

‘बाई गं’… पाच जन्माच्या बायकांपासून पिच्छा सोडवणाऱ्या नवऱ्याची तारंबळ; स्वप्निल-प्रार्थना येताहेत प्रेक्षकांच्या भेटीला

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत एक नवी कोरा, धमाल असलेला ‘बाई गं’ हा नवा चित्रपट येत्या 12 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती डॉ. आशिष अग्रवाल, नितीन प्रकाश वैद्य सोबत ओ एम जी मीडिया व्हेंचर्स यांनी केली आहे.

आतापर्यंत कायम लव्हस्टोरी मध्ये लव्ह ट्रँगल होताना दिसायचा पण आता हे चित्र थोड बदलणार आहे. एक अभिनेता आणि सोबत तब्बल 6 नायिका ही संकल्पनाच या सिनेमाची उत्सुकता वाढविणारी आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, यात हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे.

दमदार कलाकारांची टीम ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू ठरणार आहे. यामध्ये स्वप्नील जोशी मुख्य अभिनेता असून यामध्ये तो वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे , अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान अशा अफलातून अभिनेत्री ‘बाई गं’ चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. सोबतच सागर कारंडे देखील विशेष भूमिकेत असणार आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. तर, गाणी जय अत्रे, मंदार चोळकर आणि समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वरुण लिखते यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;