पहिल्याच परीक्षेत शिवाने मारली बाजी; गुरुजींकडून मिळाला खास आशिर्वाद
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेत शिवा आणि आशूच्या लग्नानंतरचे सोहळे सुरुच आहेत आणि त्यातलीच एक परंपरा आहे ती म्हणजे नवदाम्पत्याचे देव दर्शन. आशु-शिवा सुद्धा मंदिरात देवदर्शनासाठी पोहोचले आहेत. त्याचवेळेस तिथे चंदन- दिव्याही येतात.
मंदिराच्या पायऱ्या चढत असताना शिवाचा तोल जातो. पण आशू तिला सावरतो. इथे तर आशुने शिवाला सावरलं पण सीताईसमोर शिवाची बाजू कोण घेईल? तिच्या पाठीशी कोण उभं राहील?
मंदिरात गोत्र विचारल्यावर शिवाची तारांबळ उडते आणि सीताईला शिवावर रागवायची अजून एक संधी मिळते. पण यावेळी भाऊ शिवाला सांभाळून घेतात. शिवाने पूजेसाठी बनवलेला प्रसाद उत्तम झाला आहे, असं गुरूजी सांगताच रामभाऊंच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List