Pandharpur : शॉर्टकट दर्शनासाठी मिंधेंच्या खासदाराची दादागिरी; संतप्त वारकऱ्यांनी घुसखोर… घुसखोर… म्हणत दिल्या घोषणा

Pandharpur : शॉर्टकट दर्शनासाठी मिंधेंच्या खासदाराची दादागिरी; संतप्त वारकऱ्यांनी घुसखोर… घुसखोर… म्हणत दिल्या घोषणा

आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. यामुळे आषढी एकादशीच्या पर्वात श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यास 30 ते 40 तास लागतात. त्यामुळे भाविकांनी आषाढीपूर्वीच दर्शनाला गर्दी केली आहे. गोपाळपूर पत्रा शेडमध्ये दर्शन रांग पोहचली आहे. पदस्पर्श दर्शनासाठी 10 ते 12 तासांचा वेळ लागत आहे. दर्शन रांगेत 50 हजाराहून अधिक भाविक उभे आहेत.

दर्शन रांगेतील भाविकांना तत्पर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने दोन दिवसांपूर्वी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी चोख सुरू होती. पण शिंदे गटाचे खासदार संदीपान भूमारे हे आपल्या पन्नास कार्यकर्त्यांना घेवून मंदिराच्या व्हीआयपी गेटजवळ आले. शॉर्टकट दर्शनासाठी सर्वांना सोडा, असा आग्रह त्यांनी पोलिसांना केला. तथापि पोलिसांनी व्हीआयपी दर्शन बंद आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात एकटे जावू शकता, अशी विनंती केली.
मात्र, सर्वांनाच सोडा, असा आग्रह भुमरे धरून बसले. यातून पोलीस आणि भूमरे यांच्यात शाब्दिक वाद झाले. शेवटी मंदिर समितीचे अधिकारी आणि महसूलचे अधिकारी घटनास्थळी आले. भुमरेच्या दमबाजीला घाबरून त्यांनी 25 हून अधिक जणांना व्हीआयपी दर्शन दिले.

भुमरे आणि त्यांचे व्हीआयपी कार्यकर्त्यांसाठी मंदिरातील दर्शन रांग थांबविण्यात आली. ही बाब दर्शन रांगेतील भाविकांच्या लक्षात आल्यानंतर भाविकांचा संताप अनावर झाला. 10 तास आम्ही दर्शन रांगेत उभे आहोत म्हणत भाविकांनी संताप व्यक्त केला. भाविकांनी घोषणा देत भुमरे यांना डिवचले. तरीही चेहऱ्यावर निर्लज्ज हास्य आणत भुमरे आणि त्यांचे कार्यकर्ते मंदिरातून बाहेर पडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;