भंडारा जिल्हा बाल कल्याण समितीचा अजब कारभार; दिव्यांग बालकांना समितीसमोर हजर करा तरच…

भंडारा जिल्हा बाल कल्याण समितीचा अजब कारभार; दिव्यांग बालकांना समितीसमोर हजर करा तरच…

भंडारा जिल्हा बाल कल्याण समितीचा अजब कारभार सुरु आहे. दिव्यांग बालकांना समितीसमोर हजर करा तरच अर्ज मंजूर करू सांगत पीडित कुटुंबाला नाहक त्रास दिला. यावरून बाल कल्याण समिती हिटलरशाही करत असल्याचे उघडकीस आले आहे. शासन नियमांनुसार, जे बालक 80 टक्के दिव्यांग आहेत त्यांना सूट दिली जाते. मात्र बाल कल्याण समितीने दिव्यांग बालकांना समोर हजर करायला भाग पाडले.

भंडारा शहरातील जखीया शेख यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. दुर्दैवाने दोघेही जन्मतः दिव्यांग आहेत. बालकांच्या पालन पोषणासाठी बाल कल्याण विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत दिव्यांग बालकांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत मदत मिळवण्यासाठी जखीया यांनी बालकल्याण विभागात अर्ज केला.

या अर्जाचे पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे जखीया यांनी पुन्हा अर्ज केला. दुसऱ्यांदा अर्ज केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांनी घरी भेट देत सर्व सत्यता पडताळणी करून तसा अहवालही बनवला.

पुढे मंजुरीकरीता समितीच्या गोटात अर्ज पाठवला गेला. समितीसमोर सर्व कागदपत्रे असूनदेखील त्यांनी बालकांना हजर करायला लावले. नाईलाजाने पालकांनी कसेबसे मुलांना समितीसमोर हजर केले. शासनाच्या नियमात नसताना नाहक त्रास देण्याचं काम समितीने केलं आहे. शासनाच्या योजनेला पात्र असूनदेखील शेख कुटुंब लाभापासून वंचित आहे. केवळ शेख कुटुंबच नाही तर जिल्ह्यात अनेक बालके या लाभापासून वंचित आहेत.

हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेतली. सदर प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करू. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;