IRS अधिकारी अनुसूया झाली अनुकाथिर सूर्य, लिंग बदलाच्या अर्जाला केंद्राची मंजुरी

IRS अधिकारी अनुसूया झाली अनुकाथिर सूर्य, लिंग बदलाच्या अर्जाला केंद्राची मंजुरी

हैदराबाद येथील एक आयआरएस(IRS) अधिकारी एम असुसूया यांची आता पुरुष म्हणून सरकारी कागदपत्रांमध्ये नोंद होणार आहे. लिंग बदलल्यानंतर अनुसूया यांनी सरकारी कागदपत्रांमध्ये आपले नाव आणि लिंग बदलण्यासाठी मंत्रालयाकडे अर्ज केला होता. हा अर्ज मंत्रालयाने मंजूर केला असून आता त्यांना त्यांच्या विभागात पुरुष मानले जाईल. हिंदुस्थानच्या नागरी सेवेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

अनुसूया यांच्या विनंती अर्जावर विचारविनिमय करून मंत्रालयाने अखेर त्यांच्या नाव आणि लिंग बदलाला मंजुरी दिली आहे. यापुढे अनुसूया यांची ‘श्री एम अनुकाथिर सूर्य’ अशी अधिकृत नोंद केली जाईल असेही महसूल विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अनुसूया यांनी चेन्नईच्या मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बॅचलर डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट विद्यापीठातून सायबर लॉ आणि सायबर फॉरेन्सिक्समध्ये पीजी डिप्लोमा केला. यानंतर 2013 मध्ये चेन्नईमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून आपल्या कारकीर्दीला त्यांनी सुरूवात केली आणि 2018 मध्ये त्यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;