पंढरपूरला आजपासून दररोज पाणीपुरवठा
गेल्या सहा महिन्यांपासून पंढरपूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून (दि. 10) दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी दिली.
पंढरपूर शहरात आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा दि. 17 जुलै रोजी साजरा होत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाची तयारी सुरू आहे. माउली, तुकोबांची पालखी सोलापूर जिह्यात दोन दिवसांत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे भाविकांची संख्या पंढरपूर शहरात वाढू लागली आहे. आषाढीसाठी आलेले भाविक मठ, संस्थाने, खासगी रूम येथे वास्तव्य करू लागले आहेत. नागरिकांची संख्या यात्रा कालावधीत वाढत असल्याने त्यांना दैनंदिन पाणी मिळावे म्हणून नगरपालिकेच्या वतीने बुधवारपासून (दि. 10) दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. याबाबत मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी माहिती दिली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List