‘लाडकी बहीण’, ‘मोफत शिक्षण’ टिकण्याची शाश्वती नाही; अर्थसंकल्पात तरतूद न करताच सरकारकडून योजनांची घोषणा

‘लाडकी बहीण’, ‘मोफत शिक्षण’ टिकण्याची शाश्वती नाही; अर्थसंकल्पात तरतूद न करताच सरकारकडून योजनांची घोषणा

‘लाडकी बहीण योजना’, ‘विद्यार्थिनींना मोफत शिक्षण’ या योजना चांगल्या आहेत. मात्र, अर्थसंकल्पात या योजनांसाठी तरतूद न करता सरकार योजनांची घोषणा करत असल्यामुळे भविष्यात या योजना टिकतील याची शाश्वती दिसत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.

सातारा तालुक्यातील जकातकाडी येथे भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेची वार्षिक सभा व संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण आज शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभा निकडणुकीनंतर आता विधानसभा निकडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध घोषणांचा सपाटा लावला आहे. ‘लाडकी बहीण योजना’, ‘विद्यार्थिनींना मोफत शिक्षण’ या योजना निश्चितच चांगल्या आहेत. मात्र, अर्थसंकल्पात या योजनांसाठी पैशांची तरतूद न करता अर्थसंकल्पानंतर सरकार अशा घोषणा जाहीर करत असल्याने भविष्यात या योजनांची शाश्वती देता येत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकार विविध विकासकामे व योजनांची अंमलबजावणी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार करत असते. सद्यःपरिस्थितीत सरकारवर कर्जाचा डोंगर उभा आहे. सरकारपुढे आर्थिक अडचणी आहेत. अनेक योजनांसाठी, विकासकामांसाठी निधी मिळत नाही. एकढेच नक्हे तर शासकीय वसतिगृहांची अनुदाने दोन दोन वर्षे रखडली आहेत. एकीकडे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना आणि अर्थसंकल्पात तरतूद नसताना ‘लाडकी बहीण योजना’ व ‘विद्यार्थिनींना शंभर टक्के फी माफी’ची घोषणा सरकार करत आहे. त्यामुळे भविष्यात या योजना टिकतील याची शाश्वती दिसून येत नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

आताच्या अधिवेशनात मंजूर केलेल्या पुरवणी मागण्यातही ‘लाडकी बहीण’ व ‘विद्यार्थिनींना शंभर टक्के फी माफी’ची योजना दिसून येत नाही. अंदाजपत्रक जाहीर झाल्यानंतर घोषणा होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक या दोन्ही योजना चांगल्या असून, सरकार जर या योजनांना निधी देणार असेल आणि महिलांना लाभ मिळणार असेल तर आम्हीही जास्तीत जास्त महिलांना मार्गदर्शन करून त्यांचे अर्ज भरण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी गुगलीही शरद पवार यांनी टाकली.

चिन्हाचा निकालही आमच्या बाजूने लागेल!

निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला काही बाबतीत मान्यता दिल्याने विधान परिषद निवडणुकीत पक्षाची ताकद निश्चित वाढेल. पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतही न्यायालयात सुनावणी सुरू असून, तोही निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;