मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार; शिवसेनेचे श्रेय लाटण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न

मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार; शिवसेनेचे श्रेय लाटण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न

शिवसेनेने 2017 पासून तत्कालीन मुख्यमंत्री, पेंद्रीय गृहमंत्री, रेल्वेमंत्री आणि रेल्वे विभागाकडे मुंबईतील नऊ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन एलफिन्स्टन स्थानकाचे नामांतर 2018ला प्रभादेवी असे झाले, मात्र उर्वरित आठ स्थानकांच्या नामांतरासाठी पाठपुरावा सुरू असताना आज विधान परिषदेत मुंबईतील सात स्थानकांच्या नामांतराचा ठराव मांडून मंजूर करण्यात आला. हा ठराव लवकरच पेंद्र सरकारकडे पाठवून नावे बदलण्याची शिफारस करण्यात येणार आहे, अशी माहिती उपसभापतींनी दिली.

मुंबईतील रेल्वे स्थानकांना देण्यात आलेली ब्रिटिशकालीन नावे बदलण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवरील दोन, पश्चिम रेल्वेवरील दोन आणि हार्बर लाईनवरील तीन अशा एपूण सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत. याबाबत 106 अन्वये ठराव मुख्यमंत्र्यांच्यावतीने मंत्री दादा भुसे यांनी आज विधान परिषदेत मांडला. सभागृहातील सर्व सदस्यांनी या ठरावाला पाठिंबा दिला. उपसभापतींनी हा ठराव एकमताने मंजूर करत पुढील कार्यवाहीसाठी पेंद्र सरकारकडे पाठवत असल्याची घोषणा केली.

लोकसभा झाली, आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा नामांतराचा निर्णय
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 14 मार्च 2024 साली मिंधे सरकारने मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन मान्यतेसाठी पेंद्राकडे पाठवला होता, मात्र त्याचे पुढे काय झाले हे कोणालाच माहीत नाही. मात्र, पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सात लोकल स्थानकांच्या नामांतराचा ठराव विधान परिषदेत मंजूर करून तो पेंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. नावे बदलण्याचा निर्णय पेंद्राने घेतलाच तर त्याचे श्रेय विधानसभा निवडणुकीत मिंधे सरकार घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

शिवसेनेचा 2017 पासून पाठपुरावा
खासदार अरविंद सावंत यांनी 20 एप्रिल 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दक्षिण मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलून नवी नावे देण्यास महाराष्ट्र सरकारने पेंद्र सरकारकडे आग्रह धरावा, अशी विनंती केली होती. तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह आणि रेल्वेच्या संबंधित अधिकाऱयांकडेही पाठपुरावा करण्यात आला. याबाबत त्यांनी लोकसभेत प्रश्नोतराच्या तासांत स्थानकांची नावे बदलण्याची मागणी लावून धरली होती.

नावे स्थानिक परिसरावरून असायला हवीत!
मुंबईत दादरपासून बोरिवलीपर्यंत सर्व लोकल स्थानक, पोलीस आणि पोस्ट ऑफिसची नावे स्थानिक परिसरांची आहे. दक्षिण मुंबईतही मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील येणाऱया परिसरातील पोलीस आणि पोस्ट ऑफिसची नावेही स्थानिक परिसरांची आहेत. त्यामुळे लोकलची नावेही स्थानिक परिसरांवरून असायला हवी, अशी शिवसेनेची भूमिका राहिली आहे. म्हणूनच 2017 पासून या स्थानकांची नावे बदलण्यासाठी शिवसेनेची मोहीम सुरू आहे.

या स्थानकांची नावे बदलणार
– करी रोड – लालबाग
– सँडहर्स्ट रोड – डोंगरी
– मरीन लाईन्स – मुंबादेवी
– चर्नी रोड – गिरगाव
– कॉटन ग्रीन – काळाचौकी
– डॉकयार्ड – माझगाव
– किंग सर्पल – तीर्थंकर पार्श्वनाथ

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;