जालन्यात 5 लाखाचा अवैध दारू साठा पकडला, दारुसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

जालन्यात 5 लाखाचा अवैध दारू साठा पकडला, दारुसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना जिल्ह्यातील परतुर ते आष्टी रोडवर अवैधरित्या दारुचा साठा विक्रीसाठी घेवून जाणार्‍या आरोपीच्या ताब्यातून परतुर पोलीसांनी तब्बल 5 लाखांचा दारुसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाहन चालक व मालकासह वाइन शॉपच्या मालकाविरोधात परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परतूर ते आष्टी रोडवर स्वतःच्या फायद्यासाठी अवैध विक्री करण्यासाठी इंग्लिश दारूची वाहतूक करताना पिकअप टेम्पोमध्ये अवैध दारू घेऊन जात असताना पिकअप चालक ईश्वर नारायण वाघमारे रा. गुरु पिंपरी. ता. घनसावंगी तसेच त्याचा मालक संभाजी कोल्हे रा. गुरु पिंपरी ता. घनसावंगी यांना पोलीसांनी पकडले. टेम्पोमध्ये इम्प्रियल ब्लू व्हिस्की कंपनीचे दारूचे दहा बॉक्स किंमत 76 हजार 800, रॉयल चॅलेंज व्हिस्की कंपनीचे दारूची दहा बॉक्स किंमत 86 हजार 400 रुपये,रॉयल स्टॅग व्हिस्की कंपनीचे दारूचे 50 बॉक्स किंमत 43 हजार 200 दारुच्या साठ्यासह महिंद्रा पिक अप;r 5 लाख रुपये असा एकूण 10 लाख 95 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परतुर पोलीस ठाण्यात दारूचा अवैध वाहतूक करणारा आरोपी चालक ईश्वर नारायण वाघमारे रा. गुरु पिंपरी,त्याचा मालक संभाजी कोल्हे रा. गुरु पिंपरी ता. घनसावंगी, जालन्यातील रुपम वाइर शॉपचे मालक राम अग्रवाल यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल,अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, पोलीस आमलदार दीपक आडे, ज्ञानेश्वर वाघ, अच्युत चव्हाण, सतीश जाधव, चालक धोत्रे आदींनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;