पिस्तूलाचा धाक दाखवत पेट्रोल पंप मालकाची नोकराला मारहाण, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

पिस्तूलाचा धाक दाखवत  पेट्रोल पंप मालकाची नोकराला मारहाण, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव रोडवरील उमरी फाट्याजवळ असलेल्या चिंतामणी पेट्रोलपंपाच्या मालकाने पंपावर काम करणाऱ्या युवकावर पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना बाहेर आली. या पंपावर मयूर गायधने हा युवक कामाला आहे. त्याच्यावर मालकाने सोमवारी सायंकाळी चक्क पिस्तूल रोखून धाक दाखविला आहे .

उमरी फाटा येथील चिंतामणी पेट्रोल पंप हा वर्धा येथील डहाके यांच्या मालकीचा आहे. मयूर गायधने याच्यासोबत मालक व त्याच्या मुलगा यांच्यात हिशेबावरून वाद झाला. पेट्रोल पंपाचा मालक व त्याच्या मुलाने मयूर गायधने यास बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्यावर पिस्तूल उगारुन त्याला धमकविण्यात आले. याची माहिती मयुरने आपल्या नातेवाईक व मित्रांना दिली. त्यानंतर सर्वांनी कळंब पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावेळी आमला गावातील नागरिकांनी कळंब ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

या घटनेची तक्रार येताच कळंब पोलिसांनी पेट्रोल पंपाचा मालक व त्याच्या मुलाला ठाण्यात आणले. त्यांच्या जवळून पिस्तूल जप्त करण्यात आली. ही पिस्तूल एअरगन असल्याचे पेट्रोल पंपाच्या मालकाने पोलिसांना सांगितले. या प्रकरणात तक्रारीवरुन कारवाई करण्यात आली असून आरोपींवर भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याच्या 3 (25) अन्वये कारवाई करण्यात आली आहे , अशी माहिती ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी दिली आहे . दरम्यान गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच आमला येथील सरपंच विशाल वाघ यांच्यासह गावकऱ्यांनी कळंब पोलीस ठाणे गाठून हा पेट्रोल पंप बंद करण्याची मागणी केली आहे .

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;