गौतम गंभीर टीम इंडियाचा नवीन हेड कोच, BCCI ची मोठी घोषणा

गौतम गंभीर टीम इंडियाचा नवीन हेड कोच, BCCI ची मोठी घोषणा

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर उत्साहात असलेल्या टीम इंडियाला आता नवीन कोच मिळाला आहे. गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने ही घोषणा केली आहे. गौतम गंभीर राहुल द्रविडची जागा घेईल. टीम इंडियाने टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राहुल द्रविडने आपला प्रवास तिथेच संपवला होता.

गौतम गंभीर हा गेल्या महिन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर होता. गौतम गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 2024 च्या आयपीएल किताबावर नाव कोरलं. केकेआरच्या या विजयानंतरच गौतम गंभीर हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होईल, अशी चर्चा रंगली होती. आता बीसीसीआयने गौतम गंभीरच्या नावावर शिक्कमोर्तब केलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन झाल्यानंतर बीसीसीआय गौतम गंभीरच्या संपर्कात होती. त्यानंतर गौतम गंभीर याने औपरचारिकपणे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात बीसीसीआयच्या अ‍ॅडवायजरी कमिटीने त्याचा इंटरव्यूही घेतला होता. यानंतर गौतम गंभीरच्या नावाची फक्त औपचारिक घोषणाच बाकी होती.

गौतम गंभीरचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा 31 डिसेंबर 2027 म्हणजे साडेतीन वर्षांचा असेल. राहुल द्रविड नोव्हेंबर 2021 मध्ये टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला होता. त्याला 2 वर्षांचा कार्यकाळ दिला होता. द्रविडचा कार्यकाळ हा वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनललाच संपला होता. पण बीसीसीआयने टी20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;