बिग बॉसच्या घरात सापाचा मुक्त संचार; घरातील स्पर्धकांचा जीव धोक्यात, हैराण करणारा ‘तो’ व्हिडीओ पाहा…

बिग बॉसच्या घरात सापाचा मुक्त संचार; घरातील स्पर्धकांचा जीव धोक्यात, हैराण करणारा ‘तो’ व्हिडीओ पाहा…

बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच रंगात आले असून बिग बॉसच्या घरात मोठे हंगामे हे बघायला मिळत आहेत. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये नुकताच अरमान मलिक याने विशाल पांडे याच्या कानाखील जाळ काढला. हेच नाहीतर अनिल कपूर हे देखील विशालला म्हणतात की, जर तू चुकीचे बोलत नव्हता तर तू कटारियाच्या कानामध्ये का बोलला? नुकताच घरात एक टास्क झालाय. यावेळी कटारिया याला घरातील सदस्यांनी शिक्षा सुनावली आहे. यानुसार कटारिया याला गार्डन परिसरातच झोपायचे आहे. हेच नाहीतर त्याचे हातही बांधले आहेत.

सध्या सोशल मीडियावर बिग बॉस ओटीटी 3 च्या LIVE फुटेजचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोकांना मोठा धक्का बसलाय. फुटेजमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की, स्विमिंग पूलजवळ गार्डन परिसरात एक साप रेंगताना दिसत आहे. यापेक्षाही हैराण करणारे म्हणजे टास्कनंतर शिक्षा मिळाल्याने तिथेच लवकेश कटारिया हा बसलाय.

लवकेशच्या मागून तो साप जात आहे. मात्र, तो साप लवकेश याला दिसत नाही. कारण त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला आहे. जर चुकून तो साप लवकेश याच्याजवळ आला असता तर तो पळूनही जाऊ शकला नसता. कारण त्यावेळी लवकेश कटारिया याचे हातही बांधले होते. हा सर्व प्रकार पाहून लोक चांगलेच निर्मात्यांवर भडकल्याचे बघायला मिळतंय.

कारण तो विषारी साप लवकेश कटारिया या चावला असता. बिग बॉसच्या गार्डन परिसरातील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर जियो सिनेमाच्या टीमच्या मेंबरने म्हटले आहे की, व्हिडीओसोबत छेडछाड करण्यात आलीये. परंतू, मुळात म्हणजे व्हिडीओ LIVE फुटेजचा आहे. ज्यानंतर निर्मात्यांनी मोठी पोलखोल झाल्याचे बघायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे साप दिसत आहे.

या प्रकारानंतर बिग बॉस ओटीटी 3 च्या निर्मात्यांनी साप घरात असल्याच्या दाव्याला नकार दिलाय. मात्र, व्हिडीओमध्ये दिसत आहे की, साप दिसल्यानंतर गार्डन परिसर हा रिकामा करण्यात आलाय. आता यासर्व हैराण करणाऱ्या प्रकारानंतर लोक जोरदार टीका निर्मात्यांवर करताना दिसत आहेत. या अगोदरही बिग बॉसच्या गार्डन परिसरात माकडे आणि वेगवेगळे पक्षी आल्याचे अनेकदा बघायला मिळाले आहे.  मात्र, बिग बॉसच्या घरात साप पाहून सर्वचजण हैराण झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;