विराट कोहलीच्या मालकीच्या पबवर पोलिसांची मोठी कारवाई, वाचा काय आहे कारण

विराट कोहलीच्या मालकीच्या पबवर पोलिसांची मोठी कारवाई, वाचा काय आहे कारण

बार्बाडोस येथे पार पडलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात जल्लोष सुरू होता. हा विजयी सोहळा पार पडल्यानंतर त्याच रात्री विराट कोहली लंडनला रवाना झाला होता. सध्या तो पत्नी अनुष्का आणि त्याच्या दोन मुलांसह लंडनमध्ये मजा करत आहे. मात्र  विराट अडचणीच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहलीच्या बंगळुरूमधील वन8 कम्युन पबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रिकेटपटू विराट कोहलीने बंगळुरू मध्ये One8 कम्युन पब सुरू केले आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाता, गुरुग्राम या शहरांमध्ये त्याच्या शाखा आहेत. मात्र बेंगळुरूमधील शाखेवर पोलिसांनी बंद होण्याच्या वेळेबाबत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. कस्तुरबा रोडवर असलेला One8 कम्युन पब ६ जुलै रोजी मध्यरात्री दीड वाजे पर्यंत हा पब ग्राहकांसाठी सुरू ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.

वास्तविक रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांना वन8 कम्युन पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची तक्रार मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी कथित पबवर धाड घातली. यावेळी रात्री दीड वाजता पब सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे वेळेचे उल्लघन केल्याप्रकरणी या पबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, वन8 कम्युन पबकडून या कारवाईबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;