लंडनमधील ‘या’ खास ठिकाणी पोहोचले विराट-अनुष्का; व्हिडीओ व्हायरल

लंडनमधील ‘या’ खास ठिकाणी पोहोचले विराट-अनुष्का; व्हिडीओ व्हायरल

ट्वेंटी-20 विश्वचषकातील अभूतपूर्व विजयानंतर क्रिकेटर विराट कोहली त्याच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी लंडनला गेला. विश्वचषकादरम्यान विराटचं वेळापत्रक खूपच व्यग्र होतं. मात्र विश्वचषक पटकावल्यानंतर आणि भारतातील जंगी मिरवणुकीनंतर तो लगेच लंडनला रवाना झाला होता. आता लंडनमधील विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट आणि अनुष्का हे लंडनमधील इस्कॉन मंदिरात किर्तनासाठी पोहोचले आहेत. तिथलाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यावेळी अनुष्काने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. तर विराट टी-शर्ट आणि पँट अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसून आला.

विश्वचषकाच्या विजयानंतर मुंबईत टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा गौरव करण्यात आला. हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विराट कुटुंबीयांना भेटण्यासाठी लंडनला रवाना झाला. बार्बाडोस ते भारतापर्यंत 16 तास विमानातून प्रवास, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, मुंबईत व्हिक्ट्री परेड आणि वानखेडे स्टेडियमवर रात्री उशिरापर्यंत जल्लोष हे सर्व आटपून तो लगेचच लंडनला निघाला. पत्नी अनुष्का, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांना भेटण्यासाठी तो आतूर झाला होता. विजयानंतर मैदानात असताना विराटने कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पहा व्हिडीओ

एकीकडे भारतात बॉलिवूडमधील बहुतांश सेलिब्रिटी हे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात व्यग्र असताना विराट-अनुष्का मात्र किर्तनासाठी वेळ देत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. मुलगा अकायच्या जन्माआधी अनुष्का लंडनला राहायला गेली होती. विराटचं कुटुंब सध्या लंडनमध्येच राहत आहे. अकायच्या जन्मानंतर अनुष्काने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला आहे. तिच्या ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काचा हा चित्रपट गेल्या काही वर्षांपासून रखडला आहे. प्रेग्नंसीच्या आधी तिने याचं शूटिंग पूर्ण केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;