Mumbai Rain : नालेसफाईत मोठा भ्रष्टाचार, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची चौकशीची मागणी

Mumbai Rain : नालेसफाईत मोठा भ्रष्टाचार, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची चौकशीची मागणी

 

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. नालेसफाई न केल्याने पाणी रेल्वे स्टेशन आणि रस्त्यावर साचले. नागरिकांचे प्रचंड हाल झाले. निवडणुका न झाल्याने आता मुंबईत लोकप्रतिनिधी नाहीत. त्याचा फटका बसला आहे.याचा अर्थ नालेसफाईसाठी खर्च केलेले शेकडो कोटी रूपये पाण्यात गेले आहे. याप्रकरणाची शासनाने उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगनच्या माध्यमातून विधानसभेत केली आहे.

चंद्रपूर बल्लारशाह शहरात दिवसा ढवळ्या पेट्रोल बाँम्ब टाकण्यात आला. कट्ट्याचा वापर करून गोळीबार केला गेला. यामध्ये दुकान जळाले, व्यक्तीच्या पायाला गोळी लागली. तडीपार गुंडाने हा हल्ला केला. आठ दिवसापासून ही व्यक्ती शहरात फिरत असल्याची माहिती पोलीसांना होती. तरी देखील कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विधासनभा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली.

अमरावतीत देखील गोळीबार झाला झाला. मुंबईत हिट अँड रनच्या घटना सतत घडत आहेत. मिहिर शहा नावाच्या व्यक्तीने भरधाव गाडीखाली एका महिलेला चिरडले. संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे या प्रकरणांची देखील चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;