आपले जवान शहीद होतायत हा या सरकारचा नाकर्तेपणा आहे, संजय राऊत यांचे टीकास्त्र

आपले जवान शहीद होतायत हा या सरकारचा नाकर्तेपणा आहे, संजय राऊत यांचे टीकास्त्र

जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले आहे. या हल्ल्यावरून सध्या मोदी सरकारच्या काश्मीरबाबतच्या खोट्या दाव्यांवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील यावरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

”जम्मू कश्मीरात सर्व कंट्रोल मध्ये आहे. शांतता आहे असं अमित शहा आणि राजनाथ सिंह सांगत आहे. हे त्यांचं वक्तव्य आहे. पण जेव्हापासून 370 कलम हटविल्यापासून जम्मू कश्मीरची स्थिती बिघडतेय. किती जवान शहीद झाले हे कलम हटविल्यानंतर ते सांगा. हे कलम हटविल्यापासून सर्वात जास्त जवान शहीद झाले आहेत पुलवामात हल्ला झाला त्याच्या मागे काय होतं ते अजून समोर आले नाही. तेव्हापासून हल्ले सुरूच आहेत. ही जबाबादारी देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्री संरक्षण मंत्र्याची आहे. मणिपूरला, जम्मू काश्मीरला हे लोकं देशाचा हिस्सा मानत नाहीत. राहुल गांधी मणिपूरला गेले तेव्हा तुम्ही तिथली परिस्थिती बघितली. जम्मू कश्मीरची परिस्थिती  मणिपूरपेक्षा फार वेगळी नाही. दररोज लोकांच्या हत्या होत आहेत. जवान शहीद होत आहेत. मग तुम्ही त्यांना शौर्य पदकं देताय. तुम्ही त्याचा उत्सव नका बनवू. राष्ट्रपती भवनात एक तरुण मुलगी स्मृती त्यांचा पती शहीद झाला. त्यांच्या मनात काय वादळ असेल. 56 इंचाची छाती असतानाही जवान दररोज शहीद होत आहेत. आपले जवान शहीद होतायत हा या सरकारचा नाकर्तेपणा आहे, तुम्ही सत्तेत बसायच्या लायकीचे नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

”मोदींना देशाबाहेर राहणं आवडतं. देशातले प्रश्न ते सोडवू शकत नाही. त्यांना ते जमणार देखील नाही. ते फक्त फिरणार, पिकनिक करणार. मजा करणार. पुतिन आता मोदींची तारिफ करत आहेत. मोदींच्या जागी इतर कुणी असते तरी तेच बोललं असतं. पुतिन लोकशाही मानत नाही, विरोधी पक्ष संपवला आहे, विरोधकांच्या हत्या केल्या काहींना तरुंगात टाकले. आता ते पुतिन मोदींची वाहवाह करतातयत त्यात काय मोठं आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

कायदा राहिलेला नाही

”वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी शहा हा एकनाथ शिंदे यांचा जवळचा व्यक्ती आहे. त्यांचा बिझनेस पार्टनर होता अशी माहिती आहे. सध्या देशात कायदा कुठे आहे. कायदा ना जम्मू कश्मीरमध्ये आहे ना मणिपूरात आहे, ना उत्तर प्रदेशात ना महराष्ट्रात कायदा आहे. कायदा नसेल तर अशा घटना होतच राहणार, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;