साताऱ्यात ‘रेड अलर्ट’, प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

साताऱ्यात ‘रेड अलर्ट’, प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

हवामान विभागाने सातारा जिह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱया नागरिकांनी सतर्कता बाळगावी व स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नये. नदी-नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. धबधबे, धरण परिसर, घाटमाथा इत्यादी ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव जाण्याचे टाळावे. पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय घेऊ नये व मोबाईलचा वापर करू नये. प्रवास करतेवेळी घाट रस्त्यावर विनाकारण थांबू नये. अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;