खासदार लंके यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री विखे यांचे आश्वासन

खासदार लंके यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री विखे यांचे आश्वासन

कांदा व दुधाच्या दरासंदर्भात खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले ‘शेतकरी आक्रोश आंदोलन’ पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची घोषणा खासदार लंके यांनी केली.

रविवारी दुपारी पालकमंत्री विखे यांनी अकोले तालुक्यातील गणारे येथे पत्रकारांशी बोलताना विखे यांनी खासदार नीलेश लंके यांना भेटण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले होते.

त्यानंतर रविवारी रात्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पालकमंत्री विखे यांच्याशी चर्चा केल्यानंतर विखे यांनी आंदोलनस्थळी येत लंके यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. त्यानंतर काही काळासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा खासदार नीलेश लंके यांनी केली.

मागण्यांवर सकारात्मक विचार – विखे

शेतकऱयांसाठी आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. नगर जिह्याचे खासदार म्हणून नीलेश लंके हे शेतकऱयांसाठी आंदोलन करीत आहेत. त्यात काही चुकीचे नाही. याला राजकीय वळण देण्याची माझी भूमिका नाही. शेतकऱयांसाठी जे कोणी आंदोलन करत असतील त्यांच्या मागण्यांचा सरकार निश्चित विचार करेल. खासदार लंके यांनी केलेल्या मागण्या रास्त असून, यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

शेतकऱयांच्या हाती काहीतरी मिळाले तरच आमचे समाधान – खासदार लंके

कांद्याची निर्यातबंदी उठविल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. मात्र, कायमची निर्यातबंदी उठवा, अशी आमची मागणी आहे. त्यावर राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न केंद्र शासनाकडे मांडण्याची ग्वाही विखे यांनी दिली. दूध दरवाढीबाबत उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरविले जावेत, ही आमची मागणी आहे. त्यावर कायदा करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री विखे यांनी दिली, त्यासाठी त्यांनी अवधी मागितला आहे. दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी आम्ही केली. सध्या अधिवेशन सुरू असून, त्यात शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची ग्वाही विखे यांनी दिली. विखे यांनी घेतलेल्या मुदतीपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱयांच्या हाती प्रत्यक्ष काही पडल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही, असे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;