उषा उत्थुप यांच्या पतीचं निधन, टीव्ही पाहताना…, धक्कादायक कारण समोर

उषा उत्थुप यांच्या पतीचं निधन, टीव्ही पाहताना…, धक्कादायक कारण समोर

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि दिग्गज गायिका उषा उत्थुप यांचे पती चाको उत्थुप यांचं निधन झालं आहे. चाको उत्थुप यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चाको उत्थुप यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाको उत्थुप यांच्या निधनाची माहिती स्वतः कुटुंबियांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाको उत्थुप घरात टीव्ही पाहात असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. अशात कुटुंबियांनी तात्काळ चाको उत्थुप यांनी रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

चाको उत्थुप यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, चाको उत्थुप यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं. 8 जुलै रोजी चाको उत्थुप यांनी अखेरचा श्वास घेतला. 9 जुलै रोजी चाको उत्थुप यांच्या अंत्यसंस्कार होणार आहेत.

उषा उत्थुप यांचे दुसरे पती जानी चाको उत्थुप हे चहाच्या बागायती क्षेत्राशी संबंधित होते. उषा उत्थुप आणि चाको उत्थुप यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांची भेट पहिल्यांदा 70 च्या दशकाच्या सुरूवातीस प्रथम प्रसिद्ध ट्रिनकासमध्ये भेटले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

चाको उत्थुप हे उषा उत्थुप यांचे दुसरे पती आहेत. उषा उत्थुप यांनी संगीत क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण प्रदान करण्यात आला. आजही उषा उत्थुप यांनी गायीलेली गाणी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. अनेक वर्ष उषा उत्थुप बॉलिवूडमध्ये काम केलं आहे.

उषा उत्थुप यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. ‘हरी ओम हरी’, ‘रांबा हो’, ‘डिस्को डान्सर’ अशी अनेक गाणी त्यांनी गायली आहेत. उषा उत्थुप यांना शशी कपूर यांनी ब्रेक दिला आणि आज उषा उथुप एक प्रसिद्ध गायिका बनल्या उषा उत्थुप यांनी 16 भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ज्यामध्ये बंगाली, हिंदी, पंजाबी, आसामी, ओरिया, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू या भाषांचा समावेश आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;