सिंधुदुर्ग, रत्नागिरीला रेड अलर्ट
हवामानाची स्थिती पाहता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला हवामान खात्याकडून पुढील 24 तासांसाठी दक्ष राहण्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिह्यांसाठी खबरदारीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वाऱयांचा वेग 50-60 किमी प्रति तास राहण्याचा अंदाज आहे.
– उद्यादेखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढचे पाच दिवस दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, मराठवाडय़ात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात 9 ते 11 जुलैदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List