सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत बनियनवर हजेरी

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत बनियनवर हजेरी

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एक विचित्र घटना घडली. एक व्यक्ती बनियन घालून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिली. त्यामुळे न्यायाधीश संतप्त झाल्या. कोर्ट 11 मध्ये सोमवारी एक जण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने सहभागी झाला. त्या व्यक्तीने बनियन घातली होती. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना त्या व्यक्तीला पाहताच संतापल्या. न्यायाधीशांनी त्वरित विचारले, बनियनमध्ये दिसणारी ही व्यक्ती कोण आहे? कुणी पक्षकार आहे की असाच इथे आहे? त्याला बाहेर काढा.’’ न्यायमूर्ती नागरत्ना यांचा राग इथेच थांबला नाही. त्यांनी कोर्ट मास्टरला त्या व्यक्तीला इथून हटवायची विनंती केली. असा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही. यापूर्वीही अशी प्रकरणे घडलेली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;