तंबाखूचे सेवन : मृत्यूला निमंत्रण!

तंबाखूचे सेवन :  मृत्यूला निमंत्रण!

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम

भारतात तंबाखूच्या वापराचा सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे धूररहित तंबाखू आणि तंबाखूसह खैनी, गुटखा, सुपारी आणि जर्दा हे सामान्यतः वापरले जातात. विडी, सिगारेट आणि हुक्का हे धूम्रपानाचे प्रकार आहेत. तंबाखूमुळे देशात दरवर्षी सुमारे 13.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. धूरविरहित तंबाखूच्या जागतिक ओझ्यापैकी 70 टक्के भारताचा वाटा आहे, ज्यामुळे दरवर्षी 2.3 लाखांहून अधिक भारतीयांचा मृत्यू होतो. भारतात 27 टक्के कर्करोग तंबाखूच्या सेवनामुळे होतात आणि जवळपास 90 टक्के तोंडाचा कर्परोग धूरविरहित तंबाखूच्या सेवनामुळे होतो.

व्यसन प्राणघातक असते, ज्यामुळे असाध्य रोग, अपंगत्व, वेदना आणि अकाली मृत्यू होतो. सोबतच आर्थिक नुकसान, सामाजिक प्रतिष्ठा खराब होऊन घरगुती वाद, मानसिक त्रास होतो. जगात खाण्यासाठी हजारो स्वादिष्ट आरोग्यदायी पदार्थ आहेत, तरीही लोक नशेसाठी आपले मौल्यवान जीवन वाया घालवतात. तंबाखू हे असे विष आहे, जे देशात अगदी कमी किमतीत सहज उपलब्ध आहे, ज्याचे सेवन समाजातील सर्व वयोगटांतील लोक करताना दिसतात. तंबाखूची नशा शरीरात मंद विषासारखी काम करते, जे शरीराला घातक रोगांची लागण करून मारते. तंबाखूबाबत जनजागृती आणि व्यसनमुक्ती लाखो लोकांचे प्राण वाचवू शकते आणि कोटय़वधी डॉलर्ससुद्धा, जे रोगांवर उपचार करण्यासाठी खर्च केले जातात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार 2017 मध्ये धूम्रपानामुळे 80 लाख मृत्यू झाले. जागतिक स्तरावर पाचपैकी एक प्रौढ व्यक्ती धूम्रपान करते आणि 80 टक्के तंबाखू वापरकर्ते हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील आहेत. जागतिक मृत्यूंपैकी 15 टक्के मृत्यू धूम्रपानामुळे होतात. 1.6 कोटी अमेरिकन धूम्रपानासंबंधित आजारांनी ग्रस्त आहेत, अमेरिकेत दरवर्षी 4.8 लाखांपेक्षा जास्त लोक तंबाखूमुळे मरतात. तंबाखूमध्ये असलेले विषारी घटक रोगप्रतिकारक शक्ती कमपुवत करतात. त्यामुळे आजारी पडून मृत्यू होण्याचा धोका वाढतो. आर्सेनिक, शिसे, टार हे तंबाखूच्या धुरात सात हजारांपेक्षा जास्त घातक रसायनांपैकी काही आहेत. कर्करोग, फुप्फुसांचे आजार, हृदयरोग आणि पक्षाघात यांसह अनेक जीवघेण्या आजारांसाठी तंबाखूचा वापर हा एक प्रमुख जोखीम घटक आहे. असा अंदाज आहे की, जागरुकता सेवांच्या अभावामुळे 2050 पर्यंत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये जागतिक स्तरावर 16 कोटी अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात.

भारतात तंबाखूच्या वापराचा सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे धूररहित तंबाखू आणि तंबाखूसह खैनी, गुटखा, सुपारी आणि जर्दा हे सामान्यतः वापरले जातात. विडी, सिगारेट आणि हुक्का हे धूम्रपानाचे प्रकार आहेत. तंबाखूमुळे देशात दरवर्षी सुमारे 13.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. धूरविरहित तंबाखूच्या जागतिक ओझ्यापैकी 70 टक्के भारताचा वाटा आहे, ज्यामुळे दरवर्षी 2.3 लाखांहून अधिक भारतीयांचा मृत्यू होतो. भारतात 27 टक्के कर्परोग तंबाखूच्या सेवनामुळे होतात आणि जवळपास 90 टक्के तोंडाचा कर्परोग धूरविरहित तंबाखूच्या सेवनामुळे होतो.

ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया 2016-17 नुसार, भारतात सुमारे 26.7 कोटी प्रौढ (15 वर्षे आणि त्यावरील) म्हणजे 29 टक्के प्रौढ लोक तंबाखूचे सेवन करणारे आहेत, ज्यामध्ये 42 टक्क्यांहून अधिक पुरुष आणि 14 टक्क्यांहून अधिक महिलांचा समावेश आहे. किशोरवयीन मुलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण 19 टक्के आणि मुलींमध्ये 8 टक्के आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तंबाखू उत्पादक आणि ग्राहक देश आहे, जे 7,61,335 टन तंबाखूचे उत्पादन करते. 2017-18 मध्ये भारतात 35 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी तंबाखू सेवनामुळे होणाऱया सर्व आजारांवर उपचार करण्यासाठी एपूण आर्थिक खर्च 1,77,341 कोटी रुपये होता.

दरवर्षी लाखो भारतीयांचा मृत्यू सेपंडहँड स्मोकमुळे होतो. धूम्रपान न करणाऱ्या लोकसंख्येला धूम्रपान करणाऱयाच्या चुकीची किंमत मरून चुकवावी लागते, तरीही लोक तंबाखूचे व्यसन सोडत नाहीत. सेपंडहँड स्मोकिंग म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती सिगारेट/बिडी ओढते आणि त्यातून विषारी धूर आसपासच्या वातावरणात सोडते आणि त्या धुराच्या संपका&त येणारी व्यक्ती किंवा मुले हा विषारी धूर त्यांच्या शरीरात श्वासाद्वारे घेतात, तेव्हा त्याला सेपंडहँड स्मोक म्हणतात. कामाच्या ठिकाणी 30.2 टक्के प्रौढ, रेस्टॉरंटमध्ये 7.4 टक्के आणि 13.3 टक्के सार्वजनिक वाहतुकीत धुराच्या संपका&त आहेत. 21 टक्के किशोरवयीन (13-15 वर्षे वयोगटातील) सार्वजनिक ठिकाणी आणि 11 टक्के घरी धुराच्या संपका&त आहेत.

2019 मध्ये भारतीय शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूच्या वापरावर आयआयपीएसने केलेल्या ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हेनुसार, 23 टक्क्यांहून अधिक हायस्पूल विद्यार्थी घरामध्ये धूम्रपान करणे पसंत करतात. शिवाय सुमारे 20 टक्के विद्यार्थी शाळेच्या पॅम्पसमध्ये धूम्रपान करण्यास प्राधान्य देतात. हायस्पूलच्या नऊ टक्के विद्यार्थ्यांनी वारंवार तंबाखूजन्य पदार्थ वापरल्याचे नोंदवले. तंबाखू उत्पादनासाठी कीटकनाशके आणि खतांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केल्याने पाणी प्रदूषित होते आणि उत्पादनातून दरवर्षी 20 लाख टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो आणि 43 लाख हेक्टर जमीनदेखील नष्ट होते, जे जंगलतोडीला हातभार लावतात. रोग आणि पर्यावरणाची हानी रोखण्यास धूरमुक्त भविष्यासाठी जागतिक सहकार्याची आवश्यकता आहे.

पिढ्यानपिढ्या व्यसनाबद्दलचे पारंपरिक खोटेपणादेखील आपल्या समाजात मोठय़ा प्रमाणावर पसरले आहे. शोधले तर हजारो बहाणे मिळतात. नशेचा काहीच फायदा नसतो, जेव्हा की, व्यसन करणाऱ्यांना समाजात कोणीही मान देत नाही. व्यसनामुळे विनाशच होतो आणि व्यसन कधीही सोडले जाऊ शकते. फक्त प्रबळ इच्छाशक्ती हवी. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, नशेवर आयुष्य वाया घालवू नका. दृढनिश्चय, सकारात्मक विचार, जबाबदारीची जाणीव आणि आनंदी वातावरण व्यसनापासून मुक्त होण्यास मदत करते. व्यसनाधीनतेपासून मुक्त होण्यासाठी प्रथम व्यसनाधीन लोकांपासून दूर रहा. जर नशेची तलफ वाटत असेल तर फक्त निरोगी पदार्थांचा विचार करावा. आपले आरोग्य आणि कुटुंबातील सदस्यांच्या विचार करावा. पालकांनी त्यांच्या मुलांच्या वागण्याकडे आणि दिनचर्येकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये व्यसन झपाटय़ाने वाढत आहे. आजच्या आधुनिक युगात नशेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी हुक्का पार्लरचा ट्रेंडही खूपच फोफावत आहे. तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांनी ग्रस्त होऊन अकाली मरण्यापेक्षा वेळीच सावध होऊन तंबाखू सोडली पाहिजे.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;